IND vs WI T20I 2019: वेस्टइंडीज टी-20 मालिकेमधून शिखर धवन आऊट, संजू सॅमसन याला मिळाले टीम इंडियात स्थान

भारतीय सलामीवीर शिखर धवन याला वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेतून बाहेर करण्यात आले आहे. धवनला सुरतमध्ये महाराष्ट्र विरुद्ध सय्यद मुश्ताक अली करंडक सामन्यात डाव्या गुडघ्यावर खोल जखम झाली होती. अखिल भारतीय ज्येष्ठ निवड समितीने संजू सॅमसन याला टी-20 मालिकेसाठी धवनच्या जागी निवडले आहे.

संजू सॅमसन (Photo Credit: Twitter/BCCI)

भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) संघातील मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे, त्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याला वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेतून बाहेर करण्यात आले आहे. धवनला सुरतमध्ये महाराष्ट्र विरुद्ध सय्यद मुश्ताक अली करंडक सामन्यात डाव्या गुडघ्यावर खोल जखम झाली होती. धवनच्या पायाला टाके घालण्यात आले आहे. त्याच्या जखमेच्या उपचारांचा आढावा घेण्यासाठी बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने मंगळवारी त्याचे मूल्यांकन केले. धवनला आपले टाके निघून येण्यासाठी आणि जखम बरी होण्यास अजून काही काळ हवा असल्याचे बीसीसीआयच्या मेडिकल टीमने असे सुचवले आहे. शिखरने त्याच्या गुडघ्याला लागलेल्या कटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यावेळी कळले होते की शिखर मालिकेपूर्वी बरा होईल, पण आता बीसीसीआयने धवनच्या दुखापतीवर स्पष्ट केले आहे की धवन विंडीजविरुद्ध टी-20 मालिका खेळू शकणार नाही. (IND vs WI 2019: सुरक्षा कारणांमुळे वेस्ट इंडीज विरुद्ध टी-20 मालिकेच्या स्थळांची झाली अदला-बदली, पाहा आता कुठे होणार सामने)

अखिल भारतीय ज्येष्ठ निवड समितीने संजू सॅमसन (Sanju Samson) याला टी-20 मालिकेसाठी धवनच्या जागी निवडले आहे. 21 नोव्हेंबरला निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर केला होता. यामध्ये केरळच्या यष्टिरक्षक फलंदाजाला स्थान देण्यात आले नव्हते, ज्यानंतर निवड समितीवर टीका जोरदार टीका केली जात होती. बांग्लादेशविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संजूची निवड झाली होती, पण त्याला एकही सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. संजू सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत आहे. त्याने 4 सामन्यांत 112 धावा केल्या आहेत.

शिखरचा दुखापत वाला व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

Doing my prehab with great fun and positivity to heal faster!! Hand and leg coordination done right 🤣😉

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

वेस्ट इंडिजविरुद्ध भारताला तीन टी-20 आणि वनडे सामने खेळले जातील. मालिकेचा पहिला सामना 6 डिसेंबरला हैदराबादमध्ये खेळला जाईल. विंडीजच्या भारत दौऱ्याची सुरुवात टी-20 मलिकने होईल. दुसरीकडे, विंडीजसाठीही धक्कादायक बाद म्हणजे त्यांचा तुफानी फलंदाज क्रिस गेल यानेही वनडे मालिकेतून माघार घेतली आहे. गेलने याबाबत विंडीज निवड समितीला  आहे. आणि विंडीज बोर्ड लवकरच संघाची घोषणा करेल.

असा आहे भारताचा टी-20 संघ: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर , मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि संजू सॅमसन.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now