IND vs WI 3rd ODI: रिषभ पंत याने पुन्हा बहाल केली विकेट, सोशल मीडियावर चाहत्यांनी व्यक्त केला राग
युवा खेळाडू रिषभ पंत फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. अॅलेनच्या पहिल्याच चेंडूत मोठा शॉट खेळण्याच्या नादात झेल बाद झाला. आणि यंदादेखील काही कमाल करू शकला नाही. पहिल्याच चेंडूवर बाद होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याच्या नावाची बोंब सुरु केली. संजू सॅमसन किंवा ईशान किशन सारख्या युवा खेळाडूंना संधी द्यावी असा सोशल मीडियावर चाहत्यांनी सूर धरला.
टीम इंडिया (Indian Team) आणि वेस्ट इंडिज (West Indies) मधील तिसरा वनडे सामना पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानात रंगला आहे. टॉस जिंकून विंडीजने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि क्रिस गेल (Chris Gayle) आणि एव्हिन लुईस (Evin Lewis) याचा शतकी भागीदारीच्या जोरावर भारतासमोर विजयासाठी डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे 255 धावांचे आव्हान दिले. या मॅचमध्ये पावसाने अनेकदा व्यत्यय आणला. त्यामुळे दोन्ही संघासाठी 35 ओव्हरचा खेळ निश्चित केला गेला. विंडीजने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत टीम इंडियाची सुरुवात स्लो झाली. सलामी जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी मोठे शॉट्स खेळले. पण, रोहित अनिश्चितपाने बाद होऊन माघारी परतला. फेबियन अॅलेन (Fabian Allen) याने रोहितला धाव बाद केले. त्यानंतर फलंदाजी करायला आलेल्या कर्णधार विराट कोहली याने धवनच्या साथीने खेळ सावरला. पण, धवन जास्त काळ विराटला साथ देऊ शकला नाही. (IND vs WI 3rd ODI: क्रिस गेल-एव्हिन लुईस यांचा धमाका, डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे टीम इंडियाला 255 धावांचे लक्ष्य)
यानंतर युवा खेळाडू रिषभ पंत (Rishabh Pant) फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. अॅलेनच्या पहिल्याच चेंडूत मोठा शॉट खेळण्याच्या नादात झेल बाद झाला. आणि यंदादेखील काही कमाल करू शकला नाही. पंत सध्या बरेच धडे गिरवतो आहे. अनेक चुकीचे फटके त्याला नडत आहेत. आजची चूकदेखील त्याच्यावर भारी पडली. पहिल्याच चेंडूवर बाद होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याच्या नावाची बोंब सुरु केली. पंतला त्याच्या विकेटची किंमत जाणवून द्या ते संजू सॅमसन किंवा ईशान किशन सारख्या अन्य युवा खेळाडूंना संधी द्यावी असा सोशल मीडियावर चाहत्यांनी सूर धरला.
किती मूर्ख, अज्ञानी, निष्काळजी खेळाडू आहे रिषभ पंत!
पंतने जे करायला हवे होते ते श्रेयस अय्यर करीत आहे
माजी कर्णधार आणि क्षेत्ररक्षक महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) उपलब्ध नसताना मुख्य जबाबदारी पंतवर असणार आहे आणि यामुळे संघव्यवस्थापन त्याच्याकडे अपेक्षेन पहात आहे. दरम्यान, आजच्या विंडीजविरुद्ध मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या विंडीज फलंदाजांनी आपल्या लौकिकाला साजेशा खेळ केला. सलामीवीर गेलने 41 चेंडूत 72 धावांची आतिषबाजी केली. त्याने लुईसच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 11 ओव्हरमध्येच 115 धावांची भागीदारी केली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)