IND vs WI: वेस्ट इंडिज दौर्यावर अवघ्या एका विकेटने रवींद्र जडेजा रचणार इतिहास, वाचा सविस्तर
वेस्ट इंडिजचा हा दौरा जडेजाची महत्वाचा असणार आहे. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे वेस्ट इंडीजविरुद्ध फक्त एक विकेट घेऊन जडेजाच्या नावावर विश्वविक्रम नोंदविला जाईल. जडेजाने 234 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 399 विकेट्स घेतल्या आहेत.
विश्वचषकच्या सेमीफायनल सामन्यात भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने त्याच्या तुफानी फलंदाजीने सर्वांना मोहित केले होते. जडेजाने केवळ भारताला विजयाच्या जवळ आणले नाही, तर सर्व देशवासियांच्या विजयाची अशा देखी जिवंत ठेवल्या. आणि आता वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यामध्ये देखील सर्वांच्या नजरा त्याच्यावर असणार आहे. 1 ऑगस्ट पासून भारतीय संघाच्या (Indian Team0 वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दरम्यान 3 टी-20, 3 वनडे आणि 2 टेस्ट सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान जडेजा एकमात्र असा गोलंदाज आहे ज्याला टी-20, वनडे आणि टेस्ट संघात स्थान मिळाले आहे. (IND vs WI: वेस्ट इंडिज टी-20 मालिकेआधी विराट कोहली याची चाहत्यांना Treat, सरावानंतर ऑटोग्राफ देऊन फॅन्सना केले खुश, पहा Video)
कॅरिबियन देशाचा हा दौरा जडेजाची महत्वाचा असणार आहे. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे वेस्ट इंडीजविरुद्ध फक्त एक विकेट घेऊन जडेजाच्या नावावर विश्वविक्रम नोंदविला जाईल. वेस्ट इंडिजविरुद्ध एक विकेट घेत जडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या 400 विकेट्स पूर्ण करेल. आतापर्यंत सर जडेजाने 234 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 399 विकेट्स घेतल्या आहेत. आजवर जडेजाने भारतीय संघासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये 192, वनडेमध्ये 176 आणि टी-20 मध्ये 31 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेट घेणारा जडेजा देशाचा सातवा तर जगातील ५२ वां खेळाडू बनेल. भारतासाठी रविचंद्रन अश्विन (Ravichandra Ashwin), जवागल श्रीनाथ, झहीर खान, कपिल देव, हरभजन सिंह आणि अनिल कुंबळे (Anil Kumble) या खेळाडूंनी याआधी 400 किंवा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी बजावली आहे. भारतासाठी 'जॅम्बो' कुंबळेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 956 विकेट्स तर माजी श्रीलंकन फिरकी तज्न मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) 1347 आंतरराष्ट्रीय विकेट्ससह अव्वल क्रमांकावर आहे.
भारत आणि वेस्ट इंडिजमधील पहिले दोन टी-20 सामने अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे होणार आहे तर तिसरा सामना वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जाईल. या टी-20 दरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात धावांची स्पर्धा रंगणार आहे. रोहितने 94 टी-20 सामन्यात 2331 धावा केल्या आहेत. तर, विराटने 67 सामन्यात 2263 धावा केल्या आहेत. दोघांमध्ये केवळ 68 धावांचे अंतर आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)