IND vs WI ODI 2019: वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे मालिकेत विराट कोहली याला नवीन इतिहास रचण्याची संधी
आगामी विंडीजविरुद्ध वनडे मालिकेत तो रामनरेश सरवनचा वेस्ट इंडिजमध्ये भारत-वेस्ट इंडीजच्या वनडे सामन्यात भारतीय फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याचा विचारात असेल.
टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ (Indian Team) आता वनडेमध्ये वेस्ट इंडिज (West Indies) संघाशी दोन हात करण्यासाठी सज्ज होत आहे. विंडीजविरुद्ध 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत विजय मिळवत टीम इंडियाने व्हाईट वॉश पूर्ण केला. भारताने पहिला टी-20 सामना रडत-खडत जिंकला तर दुसऱ्या सामन्यात पावसाने व्यत्यय घातला होता. त्यामुळं डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने 22 धावांनी सामना जिंकला. आणि तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाने सहजतेने सामना जिंकला. मागील दोन्ही सामन्यात टीम इंडियाची गोलंदाजी आणि फलंदाजी उत्कृष्ट राहिली. त्यामुळे टी-20 सामन्याप्रमाणे वनडेमध्ये देखील भारताचे वर्चस्व राहील यात शंका नाही. (IND vs WI ODI 2019: वेस्ट इंडिजमध्ये जे सचिन तेंडुलकर यालाही नाही जमले 'ती' कामगिरी करण्याची टीम इंडिया फलंदाजांना करण्याची संधी, वाचा काय ते)
भारताची आघाडीच्या फळीत शिखर धवन (Shikhar Dhawan) याला वगळता रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने संतोषजनक खेळी केली आहे. त्यामुळे वनडे मालिकेत देखील त्यांच्याकडून मोठ्या केळीची अपेक्षा आहे. कोहलीने विश्वचषकमध्ये शतक झळकावले नसले तरी त्याने जगभरात धावा करत अनेक विक्रम मोडले आहेत. आणि विंडीजविरुद्ध वनडे मालिकेतदेखील तो आपले वर्चस्व कायम राखण्यास उत्सुक असेल. विंडीजविरुद्ध वनडे मालिकेत विराट अनेक विक्रम मोडीत काढण्याच्या तयारीत आहे. भारत (India) -वेस्ट इंडीज वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा कोहलीच्या नावावर आहे. भारतीय कर्णधार भारताच्या कर्णधाराने 33 सामन्यांत 70.81 च्या सरासरीने 1912 धावा केल्या आहेत. आगामी विंडीजविरुद्ध वनडे मालिकेत तो रामनरेश सरवनचा (Ramnaresh Sarwan) वेस्ट इंडिजमध्ये भारत-वेस्ट इंडीजच्या वनडे सामन्यात भारतीय फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याचा विचारात असेल. सरवनने 17 सामन्यात 700 धावा केल्या आहेत आणि कोहलीपेक्षा अवघ्या 144 धावा पुढे आहे. कोहलीने 12 सामन्यात 55.60 च्या सरासरीने वेस्ट इंडिजमध्ये 556 धावा केल्या आहेत. विंडीजचा महान फलंदाज क्रिस गेल (Chris Gayle) 512 धावांनी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, वेस्ट इंडिजमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या डेसमंड हेन्स (Desmond Haynes) यांचा सामन्यात शतकं ठोकण्याचा विक्रम देखील विराट मोडीत काढू शकतो. कोहली आणि हेन्स 2 शतकांच्या बरोबरीत आहेत. शिवाय त्याने भारत-वेस्ट इंडिज सामन्यात सर्वाधिक 7 शतकं केली आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खालील अहमद, आणि नवदीप सैनी.