IND vs WI ODI 2019: तिसऱ्या वनडेआधी पोर्ट ऑफ स्पेन येथे श्रेयस अय्यर बनला Tarzan, पहा व्हिडिओ
याचदरम्यान, अय्यर शिखर धवन, खालील अहमद, कीरोन पोलार्ड आणि अन्य खेळाडूंसह मोकळ्या वेळेचा आनंद लुटत आहे. श्रेयसने सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो टार्झन बनलेला दिसतोय.
टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर आहे. भारतीय संघाने (Indian Team) विंडीज दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. 3 सामन्यांची टी-20 जिंकत भारताने संघात विंडीजचा व्हाईट वॉश केला आणि मालिका 3-0 अशी जिंकली. आता दोन्ही संघ वनडे मालिकेत अंतिम वेळा आमने-सामने येतील. भारत-वेस्ट इंडिजमधील पहिला वनडे सामना पावसामुळे रद्द झाल्यावर दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाने दमदार प्रदर्शन करत सामना जिंकला. आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. या सामन्यात भारतासाठी कर्णधार विराट कोहली आणि युवा खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी महत्वाची भूमिका बजावली. विराटने शतकी खेळी केली तर अय्यरने अर्धशतक करत संघाच्या विजयात हातभार लावला. विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत संघात स्थान न मिळाल्यावर अय्यरला वनडेमध्ये संधी देण्यात आली होती. आणि त्याने त्या संधीचे सोनं केलं हे बोलणे चुकीचे ठरणार नाही. श्रेयसने 68 चेंडूंत 71 धावा केल्या. (West Indies विरुद्ध शतकी खेळीनंतर विराट कोहली याने दिली Chahal TV ला खास मुलाखत, आपल्या डान्सबद्दल केले हे रोचक विधान, पहा Video)
विंडीजविरुद्ध वनडेमध्ये अर्धशतकी खेळी करत अय्यरने चाहते आणि विशेषज्ञाची मनं जिंकली. अय्यरवर चहू बाजूने कौतुकांचा वर्षाव होत आहे. भारत (India)-विंडीज आता तिसऱ्या वनडेसाठी सज्ज होत आहे. याचदरम्यान, अय्यर शिखर धवन, खालील अहमद, कीरोन पोलार्ड आणि अन्य खेळाडूंसह मोकळ्या वेळेचा आनंद लुटत आहे. श्रेयसने नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो टार्झन बनलेला दिसतोय. अय्यरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो एका दोरीच्या साहाय्याने पाण्यात उडी मारताना दिसतोय. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन देत अय्यरने लिहिले, "तुम्ही मला सांगू शकत नाही की, मी हवेत उडू शकत नाही!"
दुसरीकडे, टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकावरील फलंदाच्या निवड विषयी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) म्हणाले की,''श्रेयसने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, त्याच्याकडे खेळण्यासाठी भरपूर ओव्हर होते आणि सोबत कोहलीदेखील होता. कोहलीने सामन्याचा तणाव आपल्याकडे घेतल्यामुळे श्रेयसला खुलून खेळता आले आणि त्याला बरेच काही शिकायलाही मिळाले.'' गावस्कर हे देखील म्हणाल की अय्यर हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो आणि रिषभ पंत याला पाचव्या क्रमांकावर पाठण्याचं त्यांनी सुचवलं.