IND vs WI 1st Test: केएल राहुल याने शेअर केला समुद्रकिनाऱ्याजवळ बसलेला फोटो; क्रिकेटपटू नाही मॉडेल बन आता म्हणत Netizens ने व्यक्त केला संताप

या फोटोमध्ये राहुल विंडीजच्या एका बीचच्या किनाऱ्यावर बसून निसर्गाचा आनंद लुटताना दिसतोय. चाहते त्यावर फारसे प्रभावित झाले नाहीत, उलट त्याने आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे असा सल्ला दिला.

केएल राहुल (Photo CreditL @klrahul11/Twitter)

वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यासाठी निवड झाली असली तर के एल राहुल (KL Rahul) याला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. विश्वचषकमध्ये राहुलने प्रभावी खेळी केली होती. पण, त्यानंतर विंडीज दौऱ्यावर टी-20 आणि वनडे मालिकेत खेळण्यासाठी निवड झाली नाही. आणि आता आगामी टेस्ट मालिकेपूर्वी खेळण्यात आलेल्या सराव सामन्याच्या पहिल्या डावात राहुलने संतोषजनक कामगिरी केली. राहुल 52 धावांवर बाद झाला. राहुलने 46 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकारासह 36 धावा केल्या. पण, संघाची सुरूवात चांगली झाली आणि त्यामुळे राहुलवर मोठी जबाबदारी होती. अशा परिस्थितीत राहुलकडून मोठी अपेक्षा होती, मात्र तो ऐन मोक्याच्या क्षणी बाद झाला. त्यामुळे विंडीज टेस्टच्या पहिल्या सामन्यात राहुलला संधी मिळते की नाही यावर सर्वांचे लक्ष लागून असेल. (IND vs WI 2019: वेस्ट इंडिजमध्ये भारतीय संघाला मिळाली जिवे मारण्याची धमकी, BCCI दिले स्पष्टीकरण)

दरम्यान, या सामन्याआधी राहुलने कॅरेबियनमध्ये रिकाम्या वेळेचा आनंद घेतानाच फोटो शेअर केला. या फोटोमध्ये राहुल विंडीजच्या एका बीचच्या किनाऱ्यावर बसून निसर्गाचा आनंद लुटताना दिसतोय. राहुलने शेअर केलेल्या या फोटोने चाहते त्यावर फारसे प्रभावित झाले नाहीत, उलट त्याने आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे असा सल्ला दिला. कॅप्शन देत राहुलने लिहिले, "दिवस पाहतो." यावर चाहत्यांना त्याला चांगलाच धारेवर धरले आहे आणि अनावश्यकपणे ट्रोल केले.

क्रिकेट नाही मॉडेलिंग कर मित्रा

पंड्या, तुझा मित्र नाही आहे तिथे, नाहीतर करून आला असता

भावा... कधी कधी भारतासाठी सामनेही जिंकून घ्या...

दरम्यान, आगामी विंडीज टेस्ट मालिकेसाठी सर्वांच्या नजरा राहुलवर असतील जेव्हा तो मयंक अग्रवाल याच्यासोबत टीम इंडियासाठी सलामीला येईल. भारत आणि वेस्ट इंडिज ए संघातील सराव सामना ड्रॉ झाला. यात, प्रत्येक खेळाडूने समाधानी कामगिरी केली. 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवून आयसीसी जागतिक टेस्ट अजिंक्यपद स्पर्धेची दणक्यात सुरुवात करण्याचा टीम इंडियाचा निर्धार असेल. शिवाय, बऱ्याच काळापासून फॉर्ममध्ये नसलेल्या अजिंक्य रहाणे याने सराव सामन्याच्या अखेरच्या दिवशी अर्धशतकी खेळी केली आणि संघाला मजबूत स्थितीत नेले.