IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्यावर विराट कोहली याला चीअर करताना दिसणार अनुष्का शर्मा, मियामी एअरपोर्ट वर झाली स्पॉट, पहा Photo
एका यूजरने मियामी एअरपोर्टवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट अनुष्का शर्मा सोबत दिसत आहे.
वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध वनडे, टी-20 आणि टेस्ट मालिकांसाठी भारतीय संघ (Indian Team) मियामी मध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला 3 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. भारत-वेस्ट इंडिजचे पहिले दोन टी-20 सामने अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये खेळले जातील. विंडीज दौऱ्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) यांच्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आले. यासर्वांमध्ये सोशल मीडियावर सध्या विराटचा एक फोटो चर्चेचा विषय बनला आहे. यंदा वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान विराटची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) त्याला चीअर करताना दिसणार आहे. एका यूजरने मियामी एअरपोर्टवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट अनुष्का शर्मा सोबत दिसत आहे. (IND vs WI: विराट कोहली याने शेअर केला टीम इंडियासोबतचा Photo, रोहित शर्मा कुठंय विचारत Netizens ने घेतली फिरकी)
दरम्यान, विश्वचषक सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध पराभवानंतर विराट आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात मतभेत असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर भारतीय संघात गटबाजी असल्याच्या चर्चा होत्या. यात विराट आणि रोहित असे दोन गट आहेत असे म्हटले जात होते. त्यानंतर रोहितने अनुष्का आणि विराटला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या अफवा पसरल्या. पण विंडीज दौऱ्यावर निघण्याआधी विराटने पत्रकार परिषद घेत रोहितसोबतच्या वादावर पडदा टाकला.
दुसरीकडे, संघात गटबाजी असल्याच्या वृत्तावर विराट म्हणाला की, "संघात गटबाजी असती तर आम्ही विश्वचषकमध्ये चांगली कामगिरी केलीच नसती. संघ हा सांघिक खेळीच्या जोरावर सेमीफायनलपर्यंत पोहचतो. ड्रेसिंग रूममधील वातावरण अतीशय उत्तम आहे".