IND vs WI 3rd T20I: टॉस जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय; रोहित शर्मा याला विश्रांती, राहुल चाहर याचे पदार्पण

आजच्या सामन्यात उपकर्णधार रोहित शर्मा याला विश्रांती देण्यात आली आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo by Michael Steele/Getty Image)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघातील तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात टॉस जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला विश्रांती देण्यात आली आहे. रोहितच्या जागी केएल राहुल (KL Rahul) याला स्थान देण्यात आले आहेत. तर युवा खेळाडू राहुल चाहर (Rahul Chahar) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहेत. चाहरला अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. 3 मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडियाने आधीच 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही मॅच जिंकून वेस्ट इंडिजचा व्हाईटवॉश करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. आजच्या या सामन्यात भारताकडून प्लेयिंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्यात आले आहे. तर विंडीज संघात फेबियन अ‍ॅलेन याला स्थान देण्यात आले आहेत. (ICC Test Rankings: विराट कोहली याच्या No 1 रँकिंगला धोका, स्टीव्ह स्मिथ याची टेस्ट क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप)

भारत-वेस्ट इंडिजमधील पहिल्या दोन टी-20 सामन्यात विजय मिळवत संघाने 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. दरम्यान, आजच्या या सामन्यात विजय मिळवत विंडीजला क्लीन स्वीप देण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. मागील सामन्यात रोहित शर्मा याचे अर्धशतक आणि कृणाल पांड्या याने शेवटच्या ओव्हरमध्ये खेळलेल्या शतकारांमुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यास मिळाले. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार समान जिंकला.

असा आहे भारतीय संघ:

केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली (कॅप्टन), रिषभ पंत, कृणाल पंड्या, मनीष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, दीपक चाहर आणि नवदीप सैनी.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif