IND vs WI 2nd Test: जमैका येथे भारतीय उच्चायुक्तांच्या घरी डिनरसाठी पोहोचली टीम इंडिया, अनुष्का शर्मा झाली ट्रोल
सेवाला नायक यांच्या घरी अधिकृत डिनरसाठी पोहचली. बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून या डिनरबद्दलचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कर्णधार विराट कोहली दिसत आहे पण, त्याची पत्नी अनुष्का शर्मा मात्र गायब आहे. आणि याच कारणामुळे चाहत्यांनी बीसीसीआयला ट्रोल केले आहे.
भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौर्यावर आहे. तीन सामन्यांच्या टी-२० आणि वनडे मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. पहिला सामना जिंकत टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे तर दुसरा कसोटी सामना 30 ऑगस्टपासून जमैका येथे खेळला जाणार आहे. सध्याच्या दौर्यावरील हा टीम इंडियाचा शेवटचा सामनादेखील असेल. या सामन्याआधी भारतीय क्रिकेट टीम भारतीय उच्चायुक्त एम. सेवाला नायक यांच्या घरी अधिकृत डिनरसाठी पोहचली. बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून या डिनरबद्दलचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कर्णधार विराट कोहली दिसत आहे पण, त्याची पत्नी अनुष्का शर्मा मात्र गायब आहे. आणि याच कारणामुळे चाहत्यांनी बीसीसीआयला ट्रोल केले आहे. (IND vs WI 2nd Test: दुसऱ्या टेस्टमध्ये कर्णधार विराट कोहली याची नजर एमएस धोनी, रिकी पॉन्टिंग आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या 'या' विक्रमांवर)
हा फोटो शेअर करताना बीसीसीआयने लिहिले की, "टीम इंडिया जमैका येथील भारतीय उच्चायुक्त यांच्या घरी अधिकृत डिनरमध्ये हजर झाली." बीसीसीआयच्या या ट्विटवर चाहत्यांनी अनुष्का कुठे आहे, अनुष्का-टीम इंडियाची कोच कुठं आहे असे विचारत बॉलीवूड अभिनेत्रीला निशाणा साधला आहे. अनुष्का विंडीज दौऱ्याच्या सुरुवातीपासून टीम इंडियासोबत प्रवास करत आहे. नुकताच तिचे विराट आणि काही खेळाडूंसह बोटवरील फोटोज सोशल मीडियावर ट्रेंड होत होते. अशाप्रकारे लोकांनी बीसीसीआयच्या ट्विटवर अनुष्का शर्माला ट्रोल केले:
भारताचे प्रशिक्षक अनुष्का शर्मा कुठे आहेत?
अनुष्का कुठे आहे?
आपला बॉस बीसीसीआय @अनुष्का शर्मा कुठे आहे?
विंडीजविरुद्ध दुसरा सामना विराटसाठी महत्वाचा असणार आहे. या सामन्यात विराटला एक नाही तर तीन रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. विंडीजविरुद्ध दुसऱ्या सामन्यात १ शतक करत विराट ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंग आणि स्टिव्ह स्मिथ यांना मागे सारत एक नवीन विक्रम आपल्या नावावर करू शकतो. दुसरीकडे, या मॅचमध्ये विजय मिळवत विराट भाराचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या टेस्ट सामन्यात सर्वाधिक विजय मिळवण्याचा रेकॉर्ड मॉडेल. विराट आणि धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने २७ समाने जिंकले आहेत.