IND vs WI 2nd Test Day 2: जसप्रीत बुमराह याचा भेदक मारा, वेस्ट इंडिज बॅकफूटवर; दुसऱ्या दिवशी विंडीजने गमावले 7 विकेट
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विंडीजने 33 षटकांत सात गडी गमावून 87 धावा केल्या होत्या.
जमैकाच्या सबिना पार्क मैदानावर भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात खेळल्या जाणार्या दुसर्या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखले आणि विंडीजला बॅकफूटवर ढकलले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विंडीजने 33 षटकांत सात गडी गमावून 87 धावा केल्या होत्या. सध्या कॉर्नवेल 4 धावा आणि हॅमिल्टनने 2 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीज संघाला भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने हादरवून टाकले. कोणताही फलंदाज त्याच्यासमोर आत्मविश्वासाने फलंदाजी करू शकला नाही. भारताच्या वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात आत्तापर्यंत बुमराहने 6 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहच्या घातक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडीज संघाने 22 धावांवरच 5 गडी गमावले होते. एकापाठोपाठ तीन विकेट्स घेत बुमराहने विंडीजच्या सलामीच्या फलंदाजांना मुश्किलीत पडले. बुमराहने प्रथम जॉन कॅम्पबेल याला रिषभ पंत याच्या हाती 2 धावांच्या वैयक्तिक स्कोरवर झेलबाद केले. यानंतर, डेरिन ब्राव्हो याला 4 धावांच्या वैयक्तिक धावसंख्यावर केएल राहुल याच्याकडून झेलबाद केले. यानंतर शामरा ब्रूक्सला एलबीडब्ल्यू बाद करून विंडीजची अवस्था 13 धावांवर 3 विकेट अशी केली. त्यानंतर त्याने रोस्टन चेस याला बाद करत हॅटट्रिक पूर्ण केली. (India vs West Indies: विराट कोहली याचा प्रेक्षकांसोबतचा व्हिडिओ पाहिला आहे का? व्हिडिओ पाहून बीसीसीआय आश्चर्यचकीत!)
बुमराहने 9.1 षटकांत केवळ 16 धावा देऊन 6 फलंदाजांना पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला. यात बुमराहने 1 हॅट-ट्रिकचा पण सहभाग आहे. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीला एक विकेट मिळाला. त्याने त्याच्या 8 षटकांत 19 धावा दिले. वेस्ट इंडिजचा कोणताही फलंदाज जास्त काळ क्रीजवर टिकून राहू शकला नाही. विंडीजचा सलामीचा फलंदाज फलंदाज कार्लोस ब्रॅथवेट याने 38 चेंडूत 10 धावा केल्या आणि याच्याशिवाय अन्य कोणतेही फलंदाज दुहेरी संख्या गाठू शकले नाही.
तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात हनुमा विहारी 111, विराट कोहलीच्या 76, इशांत शर्माच्या 57 आणि मयांक अग्रवालच्या 55 धावांच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 416 धावा केल्या. विहारीने टेस्ट करिअरमधील आपले पहिले शतक ठोकले. कॅरेबियन संघासाठी होल्डरने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या, तर रहकीम कॉर्नवॉलने 3 गडी बाद केले. केमार रोच आणि ब्रेथवेट यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.