IND vs WI 2022: भारतीय संघासाठी आनंदाची बातमी; शिखर धवन आणि श्रेयस अय्यरने केली कोरोनावर मात केली, जाणून घ्या रुतुराज गायकवाडाच्या तब्येतीचा अपडेट
टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर कोविड-19 चाचणीत निगेटिव्ह आढळले आहेत. आणि आता दोघांनाही टीम इंडियासोबत सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
IND vs WI 2022: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) अहमदाबाद येथे दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा (Team India) सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कोविड-19 चाचणीत निगेटिव्ह आढळले आहेत. आणि आता दोघांनाही टीम इंडियासोबत सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सूत्रांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार धवन आणि अय्यर यांना प्रशिक्षणासाठी परवानगी देण्यात आली आहे. “होय, शिखर आणि श्रेयसची कोविड-19 चाचणी निगेटिव्ह आली आहे आणि त्यांना प्रशिक्षणासाठी मंजुरी देण्यात आली आहे. रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) अजूनही आयसोलेशनमध्ये आहेत,” सूत्राने सांगितले. (IND vs WI 2nd ODI: ऐतिहासिक शतकाच्या उंबरठ्यावर विराट कोहली, महान सचिन तेंडुलकर-MS Dhoni यांच्या विशिष्ट यादीत होणार समावेश)
टीम इंडियाचे मंगळवारी संध्याकाळी सराव सत्र होणार आहे आणि धवन व अय्यर दोघेही त्या सत्राचा भाग असणार आहेत. भारतीय संघातील चार खेळाडू शिखर धवन, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी हे पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी कोविड पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे हे खेळाडू पहिल्या वनडेत निवडीसाठी उपलब्ध नव्हते. या खेळाडूंच्या जागी मयंक अग्रवाल, ईशान किशन आणि शाहरुख खान यांना भारतीय संघात सामील करण्यात आले. पहिल्या वनडे सामन्यात किशनने रोहित शर्मासोबत सलामीला उतरला. पण आता दुसऱ्या वनडे सामन्यासाठी केएल राहुलचे संघात परतल्यामुळे रोहित आणि राहुल डावाची सुरुवात करू शकतील तर, किशनला बाहेर बसावे लागेल असे अपेक्षित आहे. दुसरीकडे, धवन आणि श्रेयस बरे झाले आहेत, परंतु दुसऱ्या वनडेत खेळण्याबाबत कोणत्याही प्रकारचे अधिकृत विधान समोर आलेले नाही.
वैयक्तिक कारणांमुळे राहुल पहिल्या वनडेला मुकला. तर मयंकला आयसोलेशनमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर बसावे लागले होते. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहितच्या नेतृत्वात संघाने विंडीजचा सहा गडी राखून पराभव केला. आणि आता भारत-वेस्ट इंडिज यांच्यात आता बुधवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुसरा वनडे सामना रंगणार आहे.