IND vs WI 1st Test: विराट कोहली याने सुरु केली नवरात्रीची तयारी, मैदानातच केली दांडियाची प्रॅक्टिस, पहा हा Entertaining व्हिडिओ

अँटिगामध्ये पहिल्या कसोटीदरम्यान कोहली भांगडा नाही तर दांडिया करून चाहत्यांचे मनोरंजन केले. कोहलीला कोणाची ही पर्वा न करता अशा प्रकारे मैदानातच डान्स करताना पाहणे चाहत्यांसाठी एक ट्रीटच होती.

विराट कोहली (Photo Credit: @mufaddal_vohra/Twitter)

कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात दाणून पराभव केला. भारतासाठी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह यांनी प्रभावी कामगिरी केली आणि संघाचा विजय निश्चित केला. भारताच्या दुसऱ्या डावात रहाणेने कसोटी क्रिकेटमधील 10 वे शतक केले तर बुमराहने विंडीजचे पाच विकेट घेत यजमानांना मुश्किलीत पडले. टीम इंडियाचा विंडीज दौऱ्या सुरुवातीपासूच रोमांचक बनला होता. या दौऱ्यादरम्यान असे अनेक प्रसंग पाहायला मिळाले ज्यांचा उल्लेख करणे महत्वाचे आहेत. पावसाशिवाय खेळाडूंनी देखील चाहत्यांचे पूर्ण मनोरंजन केले. यात कोहलीच्या एका वनडे सामन्यादरम्यान डान्स व्हिडिओने भर घातली. आता पुन्हा असाच एक व्हिडिओ समोर आला. (IND vs WI 1st Test: विराट कोहली याने मोडला सौरव गांगुली याचा सर्वात मोठा रेकॉर्ड, एमएस धोनी याच्याशी साधली बरोबरी)

नवरात्रीसाठी अजून महिनाभर शिल्लक आहे, पण विंडीजविरुद्ध पहिल्या टेस्टच्या चौथ्या दिवशी विराट आत्तापासूनच नवरात्रीची तयारी करताना दिसला. विराटने विंडीजविरुद्ध वनडे सामन्यादरम्यान सांगितले होते की तो जेव्हा-जेव्हा संगीत ऐकतो त्याला डान्स करायचे मन होते. असाच काहीस पहिल्या टेस्टच्या चौथ्या दिवशीदेखील पाहायला मिळाले. अँटिगामध्ये पहिल्या कसोटीदरम्यान कोहली भांगडा नाही तर दांडिया करून चाहत्यांचे मनोरंजन केले. कोहलीला कोणाची ही पर्वा न करता अशा प्रकारे मैदानातच डान्स करताना पाहणे चाहत्यांसाठी एक ट्रीटच होती.

दुसरीकडे, विंडीजला 318 धावांनी पराभूत करत विराटने अनेक विक्रमांना गवसणी घातली. एकीकडे त्याने विदेश भूमीवर सर्वाधिक विजयी टीम इंडियाचे नेतृत्व करण्याच्या माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचा विक्रम मोडले तर, एमएस धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या टेस्टमध्ये भारतासाठी सर्वाधिक विजय मिळवण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. टीम इंडियाचा कर्णधार म्हणून कोहलीने 47 सामन्यांपैकी 27 सामने जिंकले आहेत, तर धोनीने 60 पैकी 27 सामने जिंकले आहेत.