IND vs WI 1st Test: टीम इंडियाच्या Playing XI बद्दल सतत होणाऱ्या बदलांवर विराट कोहली याने केले 'हे' मोठे विधान
वेस्ट इंडिजविरुद्ध दौऱ्यावरदेखील भारताची प्लेयिंग इलेव्हन चर्चेचा विषय असेल हे विराट आणि संघ व्यवस्थापनाला ठाऊक होते. पण, “संघाचे सर्वोत्तम हित” लक्षात घेऊन सर्व निर्णय घेतले जातात, यावर विराटने ठामपणे सांगितले आहे.
विश्वचषकमधील पराभवानंतर टीम इंडियाच्या (Team India) प्लेयिंग एलेव्हनमध्ये सतत होणाऱ्या बदलांवर जाणकारांकडून टीका केली जात होती. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय व्यवस्थापानाने नियमितपणे संघात बदल करण्याबाबत अजिबात संकोच केला नाही. विराट टीकाकारांच्या प्रतिक्रियांवर जास्त लक्ष न देत विरोधी संघ आणि पिचप्रमाणे संघाच्या प्लेयिंग एलेव्हनमध्ये बदल करत राहिला. वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध दौऱ्यावरदेखील भारताची प्लेयिंग इलेव्हन चर्चेचा विषय असेल हे विराट आणि संघ व्यवस्थापनाला ठाऊक होते. पण, “संघाचे सर्वोत्तम हित” लक्षात घेऊन सर्व निर्णय घेतले जातात, यावर विराटने ठामपणे सांगितले आहे. (IND vs WI 1st Test: विराट कोहली याने सुरु केली नवरात्रीची तयारी, मैदानातच केली दांडियाची प्रॅक्टिस, पहा हा Entertaining व्हिडिओ)
टीम इंडियाने विंडीजविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करत पहिल्या टेस्ट सामन्यात यजमान देशाचा दाणून पराभव केला. पण, या सामन्यात अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर चांगलेच निराश झाले होते. अश्विनला प्लेयिंग इलेव्हनमध्ये न घेता एकट्या रवींद्र जडेजा याला स्थान मिळाले. याबद्दल सामन्यानंतर विराटने आपले मत मांडले आणि म्हणाला की, "आम्ही सामूहिक चर्चा करतो आणि त्यानंतर संघासाठी सर्वात चांगले काय हे ठरवितो. प्लेयिंग इलेव्हन बद्दल नेहमीच मते असतात, पण हे टीमच्या हिताचे आहे हे लोकांना कळेल."
कोहलीने मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्मा याच्यापेक्षा युवा हनुमा विहारी याला प्राधान्य दिले. आणि ते विहारीने योग्य सिद्ध करून दाखवले. विहिरीने डावात 93 धावा केल्या. ""विहारीला होकार मिळाला कारण संयोजन महत्त्वाचे होते. तो एक प्रभावी पार्ट-टाईम गोलंदाज आहे आणि जेव्हा आम्हाला ओव्हर-रेट मिळण्याची आवश्यकता असते तेव्हा आम्हाला त्याची मदत मिळते."