IND vs WI 1st Test: विराट कोहली याने मोडला सौरव गांगुली याचा सर्वात मोठा रेकॉर्ड, एमएस धोनी याच्याशी साधली बरोबरी, वाचा सविस्तर

विंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर विराटने माजी भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनी खेळाच्या प्रदीर्घ स्वरुपात भारतासाठी सर्वाधिक विजय मिळवण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

विराट कोहली, सौरव गांगुली, एमएस धोनी (Photo Credit: Getty)

अँटिगा (Antigua) येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजला (West Indies) 318 धावांनी पराभूत करून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने खास कामगिरी आपल्या नावावर केली. धावांच्या बाबतीत हा विदेशी भूमीवरील भारताचा सर्वात मोठा विजय असल्याचे सिद्ध झाले. तर, विंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर विराटने माजी भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या खेळाच्या प्रदीर्घ स्वरुपात भारतासाठी सर्वाधिक विजय मिळवण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. टीम इंडियाचा कर्णधार म्हणून कोहलीने 47 सामन्यांपैकी 27 सामने जिंकले आहेत, तर धोनीने 60 पैकी 27 सामने जिंकले आहेत. कोहलीने सर्वप्रथम टेस्ट संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर धोनीच्या निवृत्तीनंतर कोहलीला कसोटी संघाची कमान देण्यात आली होती. (IND vs WI 1st Test: अजिंक्य रहाणे याचे दमदार शतक; टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी)

विंडीजविरुद्ध विजयासह एकीकडे कोहलीने धोनीच्या रेकॉर्डची बरोबरी केली तर दुसरीकडे, त्याने माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्या एका विक्रमला गवसणी घातली आहे. कसोटी क्रिकेटमधील परदेशी भूमीवर सर्वाधिक सामने जिंकणारा कोहली भारताचा पहिला कसोटी कर्णधार ठरला. यापूर्वी हा विक्रम गांगुलीच्या नावावर होता. गांगुलीने विदेशी भूमीवर एकूण 28 सामने खेळले, त्यापैकी 11 सामन्यात त्याने विजय मिळवून दिला. आता या विजयसह विराटने गांगुलीला मागे टाकले आहेत. विराटने आतापर्यंत विदेशी एकूण 26 टेस्ट सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 12 सामन्यात विजय मिळवला. म्हणजेच परदेशी भूमीवरील सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या दृष्टीने विराटने भारतीय कर्णधारासाठी एक नवीन इतिहास रचला आहे.

शिवाय, कोहलीने आपल्या नावावर आणखी एक आश्चर्यकारक कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून 100 किंवा त्याहून अधिक सामने जिंकणारा तो तिसरा कर्णधार ठरला आहे. विराटच्या आधी ही कामगिरी माजी भारतीय कर्णधार धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांनी केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif