IND vs WI 1st Test: वेस्ट इंडीजविरुद्ध 'या' खेळाडूला मिळू शकते टीम इंडियाच्या Playing XI मध्ये स्थान, सराव सामन्यात केले शानदार प्रदर्शन
चेतेश्वर पुजाराशिवाय 187 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकारासह रोहित शर्माने 68 धावांची शानदार खेळी केली. आणि रोहितच्या या कामगिरीच्या जोरावर त्याला पहिल्या टेस्टच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.
टी-20 आणि वनडे मालिकेनंतर टीम इंडिया (Team India) आता 2-सामन्यांच्या टेस्ट मालिकेत वेस्ट इंडिजशी (West Indies) दोन हाथ करण्यासाठी सज्ज आहे. पण, त्याआधी भारतीय संघ आणि विंडीज ए संघात 3 दिवसाचा सराव सामना खेळण्यात येत आहे. टेस्ट फॉर्मेटमध्ये भारताचा सर्वात विश्वासू फलंदाजम्हणजे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्या शतकाच्या जोरावर भारताने कुलिज क्रिकेट मैदानावर वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष-11 यांच्याविरुद्ध तीन दिवसीय सराव सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या शेवटपर्यंत पहिल्या डावात 5 बाद 297 धावा केल्या. टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करताना भारताने 88.5 षटकांचा सामना केला. पुजाराशिवाय 187 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकारासह रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 68 धावांची शानदार खेळी केली. आणि रोहितच्या या कामगिरीच्या जोरावर त्याला पहिल्या टेस्टच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. (IND vs WI 2019: वेस्ट इंडिजमध्ये भारतीय संघाला मिळाली जिवे मारण्याची धमकी, BCCI दिले स्पष्टीकरण)
विंडीज ए विरुद्ध सराव सामन्यात भारताची सुरुवात काहीशी चांगली झाली नाही. टेस्ट संघात नियमित सलामीवीर दर्जा मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करणारा मयंक अग्रवाल स्वस्तात बाद झाला. अग्रवाल फक्त 12 धावा करत माघारी परतला. त्यानांतर पुजारा आला. त्याने केएल राहुल याच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण, राहुल 52 धावा करून बाद झाला. राहुलनंतर लगेचच भारताला अजिंक्य रहाणे याच्या रूपात भारताला गंभीर झटका बसला. राहणे 1 धावा करू शकला. पण, रहाणेची जागा घेण्यासाठी आलेल्या रोहितने पुजारासमवेत चौथ्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी करुन भारताला कठिण परिस्थितीतुन काढले. रोहितने 115 चेंडूंच्या संयमी खेळीत आठ चौकार आणि एक षटकार लगावला.
दरम्यान, यंदाच्या विंडीज दौऱ्यावर रोहितला काही खास कामगिरी करता आली नाही. टी-20 मध्ये त्याने दोन सामन्यात रोहितने संतोषजनक खेळी केली. दुसऱ्या टी-20 मध्ये त्याने अर्धशतक केले. पण, वनडेमध्ये त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाही. त्यामुळे,आता टेस्ट मालिकेत तरी रोहित चांगली खेळी करण्याच्या निर्धारित असेल.