IND vs WI 1st Test: अजिंक्य रहाणे याचे दमदार शतक; टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी

विंडीजला विजयासाठी 419 धावांचे देण्यात आले होते. पण, ते त्यांना पेलता आले नाही आणि त्यांचा डाव 100 धावांमध्ये आटोपला. भारताने चौथ्या दिवशी 318 धावा अश्या मोठ्या फरकाने सामान जिंकला.

(Photo Credit: @BCCI/Twitter)

टीम इंडियाचा टेस्ट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने (India) पहिल्या टेस्ट सामन्यात वेस्ट इंडिजचा (West Indies) दाणून पराभव केला आहे. विंडीजविरुद्ध पहिल्या सामन्यात भारताने दूसरा डाव 7 बाद 343 धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात भारतासाठी रहाणेने कसोटी क्रिकेटमधील 10वे शतक झळकावले. विंडीजला विजयासाठी 419 धावांचे देण्यात आले होते. पण, ते त्यांना पेलता आले नाही आणि त्यांचा डाव 100 धावांमध्ये आटोपला. भारताने चौथ्या दिवशी 318 धावा अश्या मोठ्या फरकाने सामान जिंकला. दुसऱ्या डावात रहाणेने शतक करून भारताला मोठी आघाड़ी मिळवून दिली. चौथ्या दिवशी रहाणेने हनुमा विहारी (Hanuma Vihar) याच्या सहाय्याने पाचव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. विहारीने 128 चेंडूत 93 धावा केल्या. (IND vs WI 1st Test: लज्जास्पद रेकॉर्ड करणाऱ्या मिगेल कमिन्स याच्या संथ फलंदाजीमुळे विराट कोहली भडकला; Sledge करत म्हणाला 'ही' मजेदार गोष्ट)

त्यानंतर गोलंदाजांनी देखील प्रभावी खेळी केली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने विंडीजला 100 धावांत गुंडाळलं. बुमराहने फक्त 7 धावा देत 5 गडी बाद केले. त्याशिवाय पहिल्या डावात 5 विकेट घेणाऱ्या इशांत शर्मा याने 31 धावा देत 3 गडी बाद केले होते. मोहम्मद शमीनं 2 गडी बाद केले. दरम्यान, चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 51 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या विकेटकीपर रिषभ पंत याला देखील साजेशी खेळी खेळता आली नाही. त्यानंतर रहाणे शतक करत शॅनन गॅब्रिएल (Shannon Gabriel) याच्या गोलंदाजीवर 102 धावा करत बाद झाला. विहारी 93 धावांवर बाद झाल्यानंतर भारताने दूसरा डाव अखेर 7 बाद 343 धावांवर घोषित करत विंडीजला 419 धावांचे आव्हान दिले.

टीम इंडियाने दिलेल्या 419 धावांचा पाठलाग करत असताना विंडीजने पहिली विकेट 7 धावांवर गमावली. बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर सलामी फलंदाज क्रिग ब्रेथवेट 1 धावा करत स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर 10 धावांवर वेस्टइंडिजने आणखी दोन विकेट गमावले. त्यानंतर विंडीज फलंदाज एका मागोमाग झटपट बाद झाले आणि त्यांनी 50 धावांवर 9 वी विकेट गमावली. केमार रोच याने एकाकी झुंज देत पराभव आणखी 50 धावांनी लांब नेला. मात्र, 100 धावांवर असताना रोच बाद झाला आणि विंडीजचा डाव समापुष्टात आला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif