IND vs WI 1st T20I: विराट कोहली याला स्लेज करणे केसरीक विल्यम्स याला पडले महागात, संतापलेल्या 'किंग कोहली'ने या अंदाजात दिले प्रत्युत्तर, पाहा हा Video

भारतीय डावाच्या 16 व्या ओव्हर दरम्यान विराटने विंडीजचा गोलंदाज केसरीक विल्यम याला त्याच्याच शैलीत सलग दोन चेंडूंवर चौकार लगावत उत्तर दिले. कोहलीने त्याच्या चेंडूवर सलग दोन चौकार लगावत त्याला थक्क केले.

विराट कोहली (Photo Credit: Instagram)

वेस्ट इंडिजविरुद्ध हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) बर्‍याच दिवसानंतर 'संतप्त' रूपात दिसला. या सामन्यात कोहली आणि वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज केसरिक विल्यम यांच्यात जोरदार झुंज पाहायाला मिळाली. शिमरोन हेटमायर याचे अर्धशतक आणि इतर फलंदाजांच्या योगदानामुळे वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 20 ओव्हरमध्ये 5 बाद207 धावांचे विशाल लक्ष्य दिले होते. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामी फलंदाज केएल राहुल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 18.4 ओव्हरमध्ये लक्ष्य गाठले. यादरम्यान, भारतीय डावाच्या 16 व्या ओव्हर दरम्यान विराटने विंडीजचा गोलंदाज केसरीक विल्यम्स (Kesrick Williams) याला त्याच्याच शैलीत सलग दोन चेंडूंवर चौकार लगावत उत्तर दिले. झाले असे की, 13 व्या षटकात धाव घेताना कोहली आणि विल्यम यांच्यात वादावादी झाली ज्यामध्ये मैदानावरील अंपायरला हस्तक्षेप करावा लागला. यानंतर, विल्यम सोळावा ओव्हर टाकण्यासाठी आला तेव्हा कोहलीने त्याच्या चेंडूवर सलग दोन चौकार लगावत त्याला थक्क केले. (IND vs WI 1st T20I: केएल राहुल-विराट कोहली यांची दमदार बॅटिंग; टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर 6 विकेटने विजय)

गोलंदाजांवर संतापलेल्या कोहलीने 16 व्या षटकात त्याला एक षटकार आणि एक चौकार ठोकले आणि नंतर केसिरिकच्या 'नोटबुक' स्टाईल सेलिब्रेशनच्या शैलीत त्याला उत्तर दिले. भारतीय कर्णधाराकडून अशाप्रकारे मिळालेली प्रतिकिया पाहून केसरीकही थक्क राहिला. केसरीकच्या त्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने 23 धावा काढल्या आणि मॅचमध्ये पुनरागमन केले. विल्यमच्या या षटकात कोहलीच नव्हे तर रिषभ पंत यानेही जोरदार बॅटिंग केली आणि सामन्याच्या पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला.अखेरीस कोहली 50  चेंडूंत 6 चौकार आणि 6 षटकारांसह 94 धावांवर नाबाद राहिला. विराटची ही प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. विराटची ही प्रतिक्रिया काहीशी अशी होती, तो कुणाची तरी पावती कापत आहेत. पाहा कोहलीचा हा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

You do not mess with the Skip! 🔥🔥 #TeamIndia #INDvWI @paytm

A post shared by Team India (@indiancricketteam) on

विल्यमने 2017 मध्ये कोहलीला अश्याचप्रकारे स्लेज केले होते. जमैकामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात विराटच्या बाद केल्यावर केसरीकने स्वाक्षरीच्या स्टाईलमध्ये डगआऊटमध्ये परतण्याचा इशारा विल्यमने दिला होता. त्यानंतर आता, विल्यमच्या शैलीत उत्तर देत कोहलीने तीन ऑटोग्राफचे संकेत दिले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif