IND vs WI 1st ODI: रवींद्र जडेजा याच्या रन-आऊटवर झाला विवाद; अंपायरवर भडकले विराट कोहली आणि किरोन पोलार्ड, पाहा Run-Out चा हा व्हिडिओ

या निर्णयामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ही चिडला होता. विराट चिडला आणि डग-आऊटमधून सीमारेषेजवळ चालत आला. भारतीय डावाच्या 48 व्या षटकातील चौथ्या बॉलवर ही घटना घडली.

किरोन पोलार्ड, विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यातील चेन्नई वनडे सामन्यातील अंपायरचा निर्णय वादात सापडला आहे. भारतीय फलंदाज रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला ज्याप्रकारे बाद करण्यात आले त्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.  या निर्णयामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ही चिडला होता. दुसरीकडे, भाष्यकर्ते देखील याबद्दल आश्चर्यचकित झाले. रोस्टन चेस याच्या थ्रोवर जडेजा धावबाद झाला, पण या प्रकरणात बऱ्याच वेळानंतर थर्ड अंपायरकडून मदत घेण्यात आली. थर्ड अंपायरला निर्णय देण्यास सांगण्यात आले, तोपर्यंत थ्रोचा रीप्ले मैदानावरील पडद्यावर आला होता. तसेच वेस्ट इंडीज संघाकडून कोणतेही विशेष आवाहन करण्यात आले नाही आणि अंपायरनेही याकडे दुर्लक्ष केले. यामुळे, भारतीय कर्णधार विराट चिडला आणि डग-आऊटमधून सीमारेषेजवळ चालत आला. भारतीय डावाच्या 48 व्या षटकातील चौथ्या बॉलवर ही घटना घडली. जडेजाने किमो पॉल याचा चेंडू मिडविकेटच्या दिशेने मारला आणि एक धाव घेण्यासाठी धावला.

यानंतर चेसने चेंडू पकडत सलग स्टंपवर मारत बेल्स पडले. असे दिसते की जडेजा क्रीजवर पोहोचला होता पण असे झाले नाही असे समजले. थ्रोच्या वेळी तो क्रीझपासून दूर होता. पण चेसने खास अपील केली नाही आणि अंपायरनेही थर्ड अंपायरकडे मदत मागितली नाही. पण, रिप्ले पाहिल्यावर कर्णधार किरोन पोलार्ड (Kieron Pollard) अंपायरवर नाराज दिसला आणि त्याने थर्ड अंपायरकडे जाण्यास सांगितले. आणि नंतर थर्ड अंपायरनेही जडेजाला आऊट दिले. पण हा वाद थर्ड अंपायरकडे जाण्याच्या वेळी घडला. विंडीजने जेव्हा अपील केले तोवर चेंडू डेड झाला होता, आणि पाड्यावर पाहून थर्ड अंपायरकडे जाण्याचा निर्णय घेण्याचे मानले जात आहे. यामुळे भारतीय कर्णधार कोहली चिडला आणि रागाच्या भराततो सीमेजवळ येऊन पोहचला. हा प्रकार घडल्याचे पाहून तो समाधानी दिसला नाही. तो निराशाने डोकं हलवत ड्रेसिंग रूममध्ये गेला.

दरम्यान, टॉस गमावून पहिले फलंदाजी करत भारताने 8 बाद 287 धावा केल्या. टीम इंडियाची आघाडीची फळी स्वस्तात बाद झाल्यावर श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी डाव सावरला आणि मोठा स्कोर करण्यात महत्वाचे योगदान दिले.