IND vs SL Test 2022: टीम इंडियाचा ‘हा’ दिग्गज कसोटी सामन्यात पुन्हा कहर करण्यासाठी सज्ज, श्रीलंका फलंदाजांची उडवणार तारांबळ

कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेचा सफाया करण्यासाठी आपल्या सर्वात खतरनाक खेळाडूची एन्ट्री दिली आहे ज्याने भारतीय खेळपट्ट्यांवर विरोधी संघाच्या फलंदाजांची तारांबळ उडवली आहे.

टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SL Test 2022: पाहुण्या श्रीलंका (Sri Lanka) संघाचा टी-20 मालिकेत 3-0 असा केल्यावर यजमान टीम इंडिया (Team India) आता कसोटी सामन्यात देखील लंकन संघाचा सुपडा साफ करण्यासाठी सज्ज आहे. मोहाली येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी श्रीलंका संघात घबराट पसरली असेल. टीम इंडियाचा (Team India( नवीन कसोटी कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेचा सफाया करण्यासाठी आपल्या सर्वात खतरनाक खेळाडूची एन्ट्री दिली आहे. हा खेळाडू या कसोटी मालिकेतील सर्वात धोकादायक खेळाडू असेल, जो श्रीलंकन संघाचा काळ ठरेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेला हा खतरनाक खेळाडू श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी परतला आहे, त्यामुळे श्रीलंकेचा संघही घाबरला आहे. हा मॅच-विनर दुसरा कोणी नसून स्पिन मास्टर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आहे. (IND vs SL 1st Test: विराट कोहली याला 100 व्या कसोटीत मोठ्या विक्रमाची संधी, Ashwin याच्या निशाण्यावर दिग्गज अष्टपैलूचा सर्वकालीन रेकॉर्ड)

अश्विन भारतीय खेळपट्ट्यांवर जगातील सर्वात धोकादायक फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे, ज्याने विरोधी संघाच्या फलंदाजांची तारांबळ उडवली. भारतीय खेळपट्ट्यांवर रविचंद्रन अश्विनचा सामना करणे अवघड नसून जवळपास अशक्य आहे. केवळ फिरकी गोलंदाजीच नाही तर अश्विन उत्कृष्ट फलंदाजीतही निष्णात आहे. रविचंद्रन अश्विनची कसोटी क्रिकेटमध्ये 5 शतके आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 124 आहे. अश्विनच्या नावावर कसोटी सामन्यात 430 विकेट्स आहेत. अश्विनने 30 वेळा कसोटी सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत. तसेच अश्विनने 7 सामन्यात 10 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. याशिवाय दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपल्या फिरकीचा जादू पसरवण्यात अपयशी ठरलेला अश्विन पुन्हा एका विरोधी संघावर हल्ला चढवण्यासाठी उत्सुक असेल.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून मर्यादित षटकांच्या भारतीय संघात परतलेला अश्विनला विकेटसाठी संघर्ष करावा लागला. परिणामी त्याला न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका मालिकेतून बाहेर करण्यात आले. पण आता दिग्गज भारतीय अष्टपैलू पुन्हा संघात परतला आहे आणि भारताच्या फिरकी खेळपट्टीवर श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी सज्ज आहे. भारताच्या बदलत्या खेळपट्ट्यांवर रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. अशा परिस्थितीत संघाला पुन्हा एकदा त्याच्याकडून त्याचप्रकारच्या खेळीची अपेक्षा असेल.