IND vs SL Series 2021: श्रीलंका दौऱ्यावर ओपनर शिखर धवनला मिळणार नवीन पार्टनर, हे 3 खेळाडू आहेत दावेदार

धवनचा नियमित सलामी जोडीदार रोहित देखील कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर असल्याने ‘गब्बर’ला यंदा नवीन पार्टनर मिळणार आहे. यासाठी बीसीसीआयने आयपीएलमध्ये धमाल केलेल्या युवा क्रिकेटपटूंना संधी दिली आहे.

शिखर धवनचे नाबाद अर्धशतक (Photo Credit: PTI)

IND vs SL Series 2021: टीम इंडियाच्या (Team India) आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी (Sri Lanka Tour) मर्यादित ओव्हरच्या मालिकेसाठी अनुभवी सलामी फलंदाज शिखर धवनला (Shikhar Dhawan) नेतृत्वाची जबाबरी सोपवण्यात आली आहे. जुलै महिन्यात होणारा मर्यादित षटकांचा श्रीलंका दौरा यंदा जाणे पूर्णपणे भिन्न होणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह अनेक खेळाडू इंग्लंडमध्ये 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत व्यस्त असल्याने युवा खेळाडूंचा लंका दौऱ्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे. धवनचा नियमित सलामी जोडीदार रोहित देखील कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर असल्याने ‘गब्बर’ला यंदा नवीन पार्टनर मिळणार आहे. यासाठी बीसीसीआयने (BCCI) आयपीएलमध्ये (IPL) धमाल केलेल्या युवा क्रिकेटपटूंना संधी दिली आहे. (IND vs SL 2021: श्रीलंका दौऱ्यासाठी Shikhar Dhawan याच्या नेतृत्वातील भारतीय संघात 5 नवख्या IPL स्टार खेळाडूंना संधी, पाहा त्यांची वैयक्तिक कामगिरी)

1. देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal)

कर्नाटकच्या प्रतिभावान फलंदाजाने आयपीएल 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर फ्रँचायझीसाठी काही ठोस कामगिरी बजावली. पडिक्क्लने आयपीएल 2021 मध्ये कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. शॉप्रमाणेच, त्याने देखील सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये धावांचा डोंगर उभारला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूच्या स्वभावाची परीक्षा घ्यायची असल्यास संघ व्यवस्थापन 20 वर्षीय फलंदाजाला संधी देऊ शकते.

2. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020 आणि 21 मध्ये मुंबईचा युवा क्रिकेटपटू धवनचा सलामी जोडीदार होता. धवनसह दिल्ली कॅपिटल्ससाठी या सलामी फलंदाजाने संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि आपल्या टीमच्या उत्कृष्ट कामगिरीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अशापरिस्थितीत धवनसोबत पृथ्वी सलामीला येण्याची शक्यता अधिक दिसत आहे. फक्त यंदा आयपीएलमधेच नाही तर शॉने सय्यद मुश्ताक अली टी-20 आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही चांगली कामगिरी बजावली होती.

3. रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)

चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज देखील श्रीलंकेत धवनचा पार्टनर बनण्याचा दावेदार आहे. मुंबईकर फलंदाजाने आयपीएलमधील आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित करत भारतीय संघात स्थान मिळवले आहे. सलामी फलंदाज म्हणून धवन सोबत गायकवाड एक आदर्श उमेदवार असू शकतो. शॉ आपल्या शॉट्स खेळण्याच्या प्रतिभेने मर्यादित ओव्हर क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय डेब्यू करताना दिसत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif