IND vs SL Series 2021: भारतीय संघाच्या ‘या’ 3 खेळाडूंसाठी श्रीलंका दौरा ठरू शकतो पहिली आणि अखेरची संधी

शिखर धवनच्या नेतृत्वात युवा व अनुभवी खेळाडूंनी सुसज्जित टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. आगामी दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूंसोबत अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. पण यापैकी कोणाचे पदार्पण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आज या लेखात आपण अशाच काही खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यासाठी यंदाचा श्रीलंका दौरा पहिला व अखेरचा सिद्ध होऊ शकतो.

कृष्णप्पा गौथम (Photo Credit: Instagram/gowthamyadav1)

IND vs SL Series 2021: शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात युवा व अनुभवी खेळाडूंनी सुसज्जित टीम इंडिया (Team India) सध्या श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यानंतर आता चाहत्यांना उत्सुकता लागून आहे ती श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या आगामी मर्यादित ओव्हर मालिकेची. 13 जुलैपासून वनडे मालिकेने दौऱ्याची सुरुवात होणार आहे. भारतीय संघ कदाचित एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचीही पहिलीच वेळ असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वात कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे तर धवनच्या नेतृत्वात मर्यादित ओव्हरचे तडाखेबाज खेळाडू श्रीलंकेत आहेत. आगामी दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूंसोबत अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. पण यापैकी कोणाचे पदार्पण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (IND vs SL 2021: अर्जुन रणतुंगा यांच्या ‘टीम इंडिया दुय्यम दर्जाच्या’ टीकेवर माजी श्रीलंकन दिग्गज क्रिकेटपटूने केला पलटवार)

आज या लेखात आपण अशाच काही खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यासाठी यंदाचा श्रीलंका दौरा पहिला व अखेरचा सिद्ध होऊ शकतो.

कृष्णप्पा गौथम (Krishnappa Gowtham)

श्रीलंकेविरुद्ध निवडलेल्या संघात आयपीएलचा यंदाचा सर्वात महागडा अनकॅप्ड गौथमला संधी मिळाली आहे. परंतु, कोणत्या कामगिरीच्या आधारे त्याला स्थान देण्यात आले आहे. हे समजणे खूप कठीण आहे. चेन्नई सुपर किंग्सने त्याला सर्वात मोठ्या किंमतीत खरेदी केले पण स्पर्धे स्थगित होईपर्यंत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही सामन्यात संधी मिळाली नाही. तसेच 2021 च्या घरगुती मोसमातही त्याची कामगिरी सरासरी राहिली. गौथमने 62 टी-20 सामन्यात फक्त 41 विकेट्स घेतल्या असून 15.63 च्या मध्यम सरासरीने केवळ 594 धावा केल्या आहेत. त्यामुळे या आकड्यांमधून त्यांची निवड न समजण्याजोगी आहे, म्हणूनच कदाचित ही त्यांची पहिली आणि शेवटची संधी असू शकते.

चेतन सकारिया (Chetan Sakariya)

राजस्थान रॉयल्सचा चेतन सकारिया हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. आयपीएल 2020 मधील त्याची कामगिरी पाहून त्याला श्रीलंका दौऱ्यासाठी संधी देण्यात आली आहे. सकारियाचा प्लस पॉईंट म्हणजे की तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. टीम इंडिया बर्‍याच वर्षांपासून अशा गोलंदाजाचा शोध घेत आहे. मात्र टी नटराजन भारतीय संघात ही कमी पूर्ण करतो. नटराजन सध्या जखमी झाला आहे, त्यामुळे त्याची श्रीलंका दौर्‍यावर निवड झाली नाही. परंतु नटराजन फिट झाल्यावर सकारीयाला पुन्हा भारतीय संघात संधी मिळणे अवघड होईल.

रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)

श्रीलंका दौर्‍यासाठी निवड समितीने सर्व टॉप ऑर्डर खेळाडूंची निवड केली असून नंबर 3 पर्यंत सर्व फलंदाजी करू शकतात. धवन, पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्क्ल, गायकवाड या रूपात संघात 4 सलामीवीर आहेत, पण केवळ दोन जणांना खेळण्याची संधी मिळू शकते. पृथ्वी आणि पडिक्क्लकडे पाहता गायकवाडलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणे अवघड दिसत आहे आणि सध्या भारताकडे असलेल्या अव्वल फळीतील फलंदाजांची संख्या लक्षात घेता रुतुराजचा हा पहिला आणि कदाचित येत्या काही वर्षांपर्यंत अखेरचा दौरा सिद्ध होऊ शकतो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now