IND vs SL 2021: श्रीलंका दौऱ्यावर चमकू शकते ‘या’ 3 भारतीय खेळाडूंचे भाग्य, बनू शकतात टीम इंडियाचे पुढील सुपरस्टार्स
कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर 18 जुलैपासून यजमान श्रीलंका आणि भारतीय संघात वनडे आणि टी-20 सामन्यांची मालिका रंगणार आहे. इंग्लंड कसोटी मालिकेसाठी मुख्य संघातील खेळाडू ब्रिटनमध्ये असल्याने काही युवा आणि अनकॅप्ड खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. परिणामी, अनेक भारतीय खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यावर लाइमलाईट मिळण्याची उत्कृष्ट संधी आहे.
IND vs SL Series 2021: कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर 18 जुलैपासून यजमान श्रीलंका (Sri Lanka) आणि भारतीय संघात (Indian Team) वनडे आणि टी-20 सामन्यांची मालिका रंगणार आहे. ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेसाठी मुख्य संघातील खेळाडू ब्रिटनमध्ये असल्याने काही युवा आणि अनकॅप्ड खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामन्यांची आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. श्रीलंका दौर्यासाठी (Sri Lanka Tour) भारतीय तुकडीचे नेतृत्व शिखर धवन करत आहे तर राहुल द्रविड प्रशिक्षक आहेत. भारतीय संघात राष्ट्रीय संघात अनेक महत्त्वपूर्ण खेळाडू नसले तरी वनडे आणि टी-20 मालिकेमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करणे अपेक्षित आहे. परिणामी, अनेक भारतीय खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यावर लाइमलाईट मिळण्याची उत्कृष्ट संधी आहे. आज आपण अशा 3 भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेऊया जे चमकदार कामगिरी केल्यास श्रीलंका दौर्यानंतर पुढील सुपरस्टार बनू शकतात. (IND vs SL 2021: भारत-श्रीलंका वनडे आणि टी-20 सामन्यांच्या वेळेत मोठा बदल, जाणून घ्या नवे अपडेट्स)
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)
शॉ हा पहिला खेळाडू आहे जो श्रीलंका दौर्यानंतर भारतीय क्रिकेटचा पुढील सुपरस्टार बनू शकतो. या दौऱ्यावर पृथ्वीने टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करणे अपेक्षित आहे. शॉने गेल्या वर्षी फॉर्मशी संघर्ष करत होता ज्यामुळे त्याला राष्ट्रीय संघातून सलामीवीर म्हणून देखील बाहेर करण्यात आले होते. तथापि, या वर्षाच्या सुरूवातीपासूनच 21 वर्षीय या फलंदाजाने फलंदाजीचा अभूतपूर्व प्रकार दाखविला आहे. सलामी फलंदाजाने विजय हजारे ट्रॉफी 2020-21 दरम्यान केवळ 8 सामन्यांत 165.40 च्या सरासरीने 827 धावा फटकावल्या. आयपीएल 2021 मधेही त्याने आपला शानदार फॉर्म कायम ठेवला आणि 8 डावात 308 धावा करत स्पर्धेचा चौथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. श्रीलंकेविरुद्ध पृथ्वी शॉने शिखर धवनबरोबर ओपनिंगला येण्याची अपेक्षा आहे. त्याच्या शानदार फलंदाजीमुळे शॉ स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांपैकी एक बनून स्पॉटलाइट मिळवू शकतो.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)
यादव हा आणखी एक भारतीय खेळाडू आहे जो श्रीलंका दौऱ्यानंतर पुढचा सुपरस्टार बनू शकतो. सूर्यकुमारने यंदा मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध टी-20 पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात 57 धावांची तडाखेबाज खेळी केली. नंतर आयपीएल 2021 मध्ये, त्याने 7 सामन्यात 1 अर्धशतकासह 173 धावा केल्या. श्रीलंका दौर्यादरम्यान सूर्यकुमार यादव हा भारतासाठी मधल्या फळीत महत्त्वपूर्ण फलंदाज ठरू शकतो आणि आपल्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीने तो श्रीलंका दौऱ्यानंतर संघाचा पुढचा सुपरस्टार बनू शकेल.
वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy)
वरुण चक्रवर्ती हा आणखी एक भारतीय खेळाडू आहे जो भारत विरुद्ध श्रीलंका दौऱ्यानंतर पुढचा सुपरस्टार बनण्याचा दावेदार असेल. चक्रवर्तीने चालू आणि शेवटच्या मोसमात आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.आयपीएल 2021 मध्ये चक्रवर्तीने 7 सामन्यांत 7.82 च्या शानदार इकॉनॉमी रेटने 7 विकेट्स घेतल्या. त्याच्या शक्तिशाली फिरकी हल्ल्यामुळे श्रीलंका दौऱ्यानंतर भारतासाठी पुढील स्पिन सुपरस्टार म्हणून उदयास येऊ शकतो. तसेच श्रीलंकेचे मैदानही फिरकी गोलंदाजांना साथ देते त्यामुळे चक्रवर्तींला संधी मिळाल्यास सामन्यादरम्यान बरीच मदत मिळेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)