IND vs SL: पहिल्या टी-20 आधी विराट कोहली याला फॅनने दिली खास भेट, जुन्या मोबाईल फोनने बनविले 'किंग कोहली'चे चित्र, पाहा (Video)

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी एका चाहत्याने भारतीय कर्णधार विराट कोहली याला एक खास भेट दिली. जुन्या मोबाईल फोनच्या सहाय्याने एका चाहत्याने कोहलीला त्याचे चित्र भेट दिले. हे पाहून विराट खूपच खूष झाला आणि त्याने त्याला धन्यवाद देत एक संदेश लिहिला.

विराट कोहली (Photo Credit: Twitter/BCCI)

भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी एका चाहत्याने भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला एक खास भेट दिली. श्रीलंकाविरुद्ध पहिला टी-20 सामना गुवाहाटी स्टेडियममध्ये खेळला जाईल. येथे पोहोचल्यानंतर जुन्या मोबाईल फोनच्या सहाय्याने एका चाहत्याने कोहलीला त्याचे चित्र भेट दिले. हे पाहून विराट खूपच खूष झाला आणि त्याने त्याला धन्यवाद देत एक संदेश लिहिला. बीसीसीआयने (BCCI) ट्विटरवर फॅन आणि त्याचा आवडता क्रिकेटपटू यांच्यातील या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. भारतीय कर्णधाराला खास भेट देणाऱ्या चाहत्याचे नाव राहुल परीख असून तो गुवाहाटीचा रहिवासी आहे. मोबाईल फोन आणि तारांचा वापर करून राहुलने हे चित्र बनवले असून हे त्याला तयार होण्यासाठी तीन दिवस लागले. 'जुन्या फोनवरून कलाकृती तयार करणे हे #टीम इंडिया आणि @viratkohli वर एका चाहत्याचे प्रेम आहे,' असे कॅप्शन देत बीसीसीआयने व्हिडिओ शेअर केला आहे. श्रीलंकाविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर खेळला जाईल. (IND vs SL 1st T20I 2020 Match Live Streaming: भारत विरुद्ध श्रीलंका लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर)

या व्हिडिओमध्ये चाहता म्हणतो, 'मी हे चित्र जुन्या मोबाइल फोन आणि वायरमधून बनवले आहे. मी ते तयार करण्यासाठी तीन दिवस रात्रंदिवस कष्ट केले.कोहली सरांनी मला ऑटोग्राफ दिले आहे. जेव्हा तो मला भेटायला आला तेव्हा माझ्या हृदयाचा ठोका वाढला. मला काही महिन्यांपूर्वी कळले होते की कोहली श्रीलंकेविरूद्ध सामना खेळण्यासाठी गुवाहाटीला येऊ शकतो.' पाहा या खास क्षणाचा हा व्हिडिओ:

31 वर्षीय कोहलीने गेल्या दशकात सर्वाधिक धावा केल्या. ज्यामुळे त्याचे चाहते जगातील कानाकोपऱ्यातही आढळतात. हेच कारण आहे की कोहलीच्याप्रती त्याच्या चाहत्यांचे प्रेम आम्हाला बर्‍याचदा पाहायला मिळते. तीनही स्वरूपात 50 च्या सरासरीने धावा करणारा विराट एकमेव फलंदाज आहे. तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारही आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now