IND vs SL 3rd ODI: तिसर्‍या वनडेत शिखर धवनला इतिहास घडवण्याची संधी, सौरव गांगुली व एमएस धोनी राहतील पिछाडीवर

धवन ब्रिगेडने जर तिसरा सामना जिंकला तर तो एक विक्रम आपल्या नावावर करेल. कर्णधार म्हणून तो पहिल्या वनडे मालिकेत क्लीन स्वीपचा खास विक्रम धवनच्या नावावर होईल. एमएस धोनी, विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यासारखे वनडेमध्ये कर्णधार देखील ही कामगिरी करू शकले नाहीत.

शिखर धवन (Photo Credit: PTI)

IND vs SL 3rd ODI: दुसर्‍या वनडे सामन्यात श्रीलंकेला (Sri Lanka) पराभूत करून टीम इंडियाने (Team India) वनडे मालिका जिंकली आहे. मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा समवेत वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्ये असल्याने शिखर धवनला (Shikhar Dhawan) संघाची कमान देण्यात आली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना 23 जुलै रोजी खेळला जाणार आहे. भारतीय संघ (Indian Team) क्लीन स्वीपच्या उद्देशाने मैदानात उतरेल. यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिकादेखील खेळली जाणार आहे. धवन ब्रिगेडने जर तिसरा सामना जिंकला तर तो एक विक्रम आपल्या नावावर करेल. दरम्यान, भारताने वनडे मालिका आधीच खिशात घातली असल्याने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो आणि बेंचवरील खेळाडूंना संधी देऊ शकते. (IND vs SL 3rd ODI: अखेरच्या वनडे सामन्यात टीम इंडियामध्ये मोठा बदल संभव, ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी; पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन)

कर्णधार म्हणून तो पहिल्या वनडे मालिकेत क्लीन स्वीपचा खास विक्रम धवनच्या नावावर होईल. एमएस धोनी, विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यासारखे वनडेमध्ये कर्णधार देखील ही कामगिरी करू शकले नाहीत. धोनी वनडेमध्ये टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. विराट कोहलीने कर्णधार म्हणून पहिला एकदिवसीय सामना जून 2013 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. श्रीलंकेने भारताला 161 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. या पराभवानंतर कोहलीने पुढील 8 सामने जिंकूले. तसेच माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीला देखील पहिला वनडे सामना जिंकता आला नाही. कर्णधार म्हणून गांगुलीने पहिल्या 3 सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला.

दरम्यान, श्रीलंका दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेत शिखर धवनने कर्णधार म्हणूनही सर्वाधिक धावा केल्या आहेत. धवनने 2 सामन्यात अर्धशतकांसह 115 धावा केल्या. या दरम्यान धवनने 12 चौकार आणि 1 षटकार लगावला. धवननंतर भारताकडून सूर्यकुमार यादवने 84 धावा, दीपक चेहराने 69 आणि मनीष पांडेने 63 धावा केल्या आहेत. दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार व चाहरने चांगली फलंदाजी केली आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

IND vs AUS 3rd Test 2024 Day 4 Stumps: बुमराह-आकाशने केला चमत्कार, फॉलोऑनचा धोका टळला; चौथ्या दिवसाअखेर भारताच स्कोर 252/9

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना