Video: इंदोर सामन्यात श्रेयस अय्यर याने सर्वात मोठा सिक्स मारलेला पाहून विराट कोहली याने दिली अशी प्रतिक्रिया, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाला Wow
श्रेयसचा हा शॉट पाहून विराटही स्तब्ध झाला ज्याने डोळे मोठे करत आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली.
इंदोरच्या होळकर स्टेडियम (Holkar Stadium) वर श्रीलंकाविरुद्ध 2020 मालिकेच्या दुसर्या टी-20 दरम्यान भारतीय संघाच्या (Indian Team) मधल्याफळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने शानदार षटकार ठोकला. श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने अष्टपैलू कामगिरी करत इंदोरमध्ये 7 विकेटने विजय मिळवला. केएल राहुल, श्रेयस आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी बॅटने तर नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर यांनी गोलंदाजीने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. कोहलीने टीम इंडियाला एका षटकारासह विजय मिळवून दिला. विराट 17 चेंडूत 30 धावा करून नाबाद परतला. राहुल आणि शिखर धवन बाद झाल्यावर श्रेयस आणि विराटने दमदार बॅटिंग करत संघाला विजय मिळवून दिला. मात्र, या सर्वांमध्ये श्रेयसने मारलेला सर्वात मोठा षटकार आकर्षणाचे कारण बनला. (IND vs SL 2nd T20I: रोहित शर्मा याला मागे टाकत विराट कोहली नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड, एमएस धोनी याच्यासह 'या' एलिट यादीतही झाला समावेश, वाचा सविस्तर)
वनिंदूं हसरंगा याच्या 16 व्या ओव्हरदरम्यान अय्यर कर्णधार विराटसह 27 धावांवर फलंदाजी करत असताना सामन्यातील सर्वात मोठा षटकार मारला ज्याने फक्त विराटलाच नंतर तर प्रेक्षकांनाही प्रभावित केले. हसरंगाच्या फुल चेंडूवर अय्यरने सीमा-रेषेबाहेर स्टेडियमच्या वर चेंडू मारला. श्रेयसचा हा शॉट पाहून विराटही स्तब्ध झाला ज्याने डोळे मोठे करत आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली. अय्यर नंतर 26 चेंडूत 34 धावांवर बाद झाला. पण अखेर भारताने तीन ओव्हर बाकी ठेवत आरामात हा सामना जिंकला. पाहा श्रेयसच्या षटकारावर विराटची भन्नाट प्रतिक्रिया:
दरम्यान, या सामन्यात टॉस जिंकून भारताने श्रीलंकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. श्रीलंकेने 20 षटकांत 9 बाद 142 धावा केल्या आणि भारताने 17.3 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठत 144 धावा केल्या. भारताच्या या विजयात गोलंदाजांचा महत्वाचा वाटा होता. त्यांनी श्रीलंकेच्या फलंदाजाला मुक्तपणे धावा करू दिल्या नाही. नवदीप सैनीला 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार देण्यात आले. त्याने 18 धावांवर 2 गडी बाद केले. त्याने दनुष्का गुणथिलाका याला शानदार यॉर्कर टाकत बोल्ड केले, जे सामन्याचे हायलाईट ठरले.