IND vs SL 2nd T20I Live Streaming: भारत-श्रीलंका दुसरा टी-20 सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Sports व DD Sports वर आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार असून लाइव्ह स्ट्रिमिंग आपण सोनी लिव्हवर पाहू शकता. तसेच DD Sports वर देखील सामना लाईव्ह पाहायला मिळू शकतो.

भारत विरुद्ध श्रीलंका (Photo Credit: PTI)

IND vs SL 2nd T20I Live Streaming: कोलंबो (Colombo) येथे 27 जुलै रोजी होणारा भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील दुसरा टी-20 सामना भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या (Krunal Pandya) कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यावर चोवीस तास पुढे ढकलण्यात आल्यामुळे आज अखेर सामना रंगणार आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचे (Indian Team) नऊ खेळाडू निवडीसाठी अनुपलब्ध असल्यामुळे टीम नवीन लुकमध्ये मैदानात उतरू शकते. सुरक्षेच्या कारणास्तव कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेले तब्बल आठ सदस्य दुसरा टी-20 खेळण्याची शक्यता कमीच आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरू होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार असून लाइव्ह स्ट्रिमिंग आपण सोनी लिव्हवर पाहू शकता. तसेच DD Sports वर देखील सामना लाईव्ह पाहायला मिळू शकतो. (IND vs SL 2nd T20I: टी-20 पदार्पणाची खेळाडूंना संधी, टीम इंडिया दुसर्‍या सामन्यात नवीन कर्णधार व 7 बदलांसह मैदानात उतरण्याची शक्यता)

दरम्यान, श्रीलंका दौर्‍यावर वनडे मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर टीम इंडियाला आता टी-20 मालिका देखील खिशात घालण्याची उत्तम संधी आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये आज दोन्ही संघात दुसरा टी-20 सामना रंगणार आहे. तसेच, यजमान श्रीलंकेसाठी हा सामना करो किंवा मरोचा आहे. पहिल्या सामन्यात पभावी गोलंदाजी करूनही फलंदाजांनी मात्र निराशा केली परिणामी संघाला पराभव पत्करावा लागला. तसेच संघातील खेळाडूही दुखापतग्रस्त असल्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाची निवड होती याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

पाहा भारत-श्रीलंका संपूर्ण संघ

टीम इंडिया: शिखर धवन (कॅप्टन), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्क्ल, रुतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर) , युजवेंद्र चहल, राहुल चाहर, के गौथम, क्रुणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.

श्रीलंका: दासुन शनाका (कॅप्टन), धनंजया डी सिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथम निसानका, चरित असलांका, वनिंदू हसरंगा, आशेन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरू उडारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुष्रा लखनथमे संदकन, अकिला डानंजया, शिरण फर्नांडो, धनंजय लखन, ईशान जयरात्ने, प्रवीण जयविक्रम, असिता फर्नांडो, कसुन रजीठा, लाहिरू कुमारा, इसुरु उदाना.



संबंधित बातम्या

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद

NZ Beat ENG 3rd Test 2024 Scorecard: तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा 423 धावांनी केला पराभव, मिशेल सँटनर ठरला विजयाचा हिरो; टीम साऊदीला मिळाल शानदार निरोप