IND vs SL 2021 Series: श्रीलंका दौऱ्यावर जाणार टीम इंडियाचे नवे भीडू, कोणाला मिळणार नेतृत्वाची धुरा; पहा संभाव्य भारतीय संघ

या दौऱ्यावर संघ 3 वनडे आणि 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळेल. श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संभावित भारतीय संघाबाबत जाणून घेणार आहोत. विराट कोहली व रोहित शर्मा इंग्लंडमध्ये असल्याने फिट असल्यास श्रेयस अय्यरला कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SL 2021 Series: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली  (Sourav Ganguly) यांनी जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा (India Tour of Sri Lanka) करणार असल्याचं जाहीर केलं आहे. या दौऱ्यावर संघ 3 वनडे आणि 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळेल. पण या दौऱ्याची विशेषता म्हणजे नियमित टीम इंडिया म्हणजेच विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) आणि त्यानंतर इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत व्यस्त असल्यामुळे भारतीय संघाचे नवीन भीडू दौऱ्यावर जातील. अशास्थितीत आज आपण श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संभावित भारतीय संघाबाबत जाणून घेणार आहोत. विराट कोहली (Virat Kohli) व रोहित शर्मा (Rohit Sharma) इंग्लंडमध्ये असल्याने फिट असल्यास श्रेयस अय्यरला कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. (IND vs SL 2021: टीम इंडिया जुलैमध्ये करणारा श्रीलंका दौरा, विराट-रोहित नसणार व्हाइट बॉल संघाचा भाग)

श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवन, पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्क्ल सलामीसाठी पर्याय असतील. अनुभवी ओपनर म्हणून धवनचे स्थान निश्चित असेल तर पृथ्वी व पडिक्क्लमध्ये दुसऱ्या जागेसाठी स्पर्धा असेल. तिसऱ्या स्थानावर सूर्यकुमार यादव तर चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर जबाबदारी घेईल. तसेच ईशान किशन पाचव्या स्थानासाठी एक उपयुक्त पर्याय ठरू शकतो. शिवाय, किशन संघाचा विकेटकीपर देखील असेल. हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या व राहुल तेवतिया यांचा संघात अष्टपैलू म्हणून समावेश केला जाऊ शकतो. युजवेंद्र चहल आणि राहुल चाहर फिरकीपटू असतील. दुसरीकडे, वेगवान गोलंदाजी विभागात टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे श्रीलंका दौऱ्यावर भुवी, नटराजन यांच्यासह टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतीतून पुनरागमन करताना दिसतील.

श्रीलंका दौऱ्यासाठी संभाव्य भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कॅप्टन), शिखर धवन, पृथ्वी शॉ, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल तेवतिया, टी नटराजन, राहुल चाहर, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, दीपक चाहर आणि वरुण चक्रवर्ती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif