IND vs SL 2021: श्रीलंकेत दिसणार Yuzvendra Chahal याचा नवीन अवतार, फिरकीपटूने स्वतः केली घोषणा

श्रीलंका दौऱ्यावर 13 जुलै रोजी वनडे सामन्यांच्या मालिकेने दौऱ्याची सुरुवात होणार असून एकदिवसीय संघात पुनरागमन करणाऱ्या युजवेंद्र चहलने सांगितले की, तो आपल्या गोलंदाजीतील भिन्नतेवर काम करीत आहे आणि श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत अधिक आत्मविश्वासाने भरलेला युझी दिसेल.

युजवेंद्र चहल (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SL Series 2021: श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) आगामी वनडे आणि टी-20 सामन्यांची मालिका भारताची प्रसिद्ध फिरकी जोडी, युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) व कुलदीप यादव, यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. 13 जुलै रोजी वनडे सामन्यांच्या मालिकेने दौऱ्याची सुरुवात होणार असून एकदिवसीय संघात पुनरागमन करणाऱ्या युजवेंद्र चहलने सांगितले की, तो आपल्या गोलंदाजीतील भिन्नतेवर काम करीत आहे आणि श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत अधिक आत्मविश्वासाने भरलेला युझी दिसेल. चहल म्हणाला, “माझ्याकडे काही भन्नाट आहेत (विविध गोलंदाजी) आणि मी फक्त त्यांच्यावर लक्ष केंद्रित करत आहे, इतर चेंडूंवर नाही. या मालिकेत आपल्याला अधिक आत्मविश्वासाने भरलेला युझी दिसेल. मी फक्त माझ्या अँगलने काम करत आहे आणि अधिक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करीत आहे,” श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघाच्या (Indian Team) शीर्ष प्रायोजकांच्या घोषणेसंदर्भात व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत तो म्हणाला. (IND vs SL 2021: नवदीप सैनीची भेदक गोलंदाजी, श्रीलंका क्रिकेटने शेअर केले टीम इंडियाच्या दुसऱ्या इंट्रा-स्क्वॉड सामन्याचे हायलाइट्स)

2019 वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत टीम इंडियाच्या वनडे संघातील एक महत्वपूर्ण सदस्य असलेल्या चहलला बीसीसीआयच्या वार्षिक कराराच्या यादीमध्ये ग्रेड ब पासून ग्रेड सी मधून खाली ढकलले गेले आणि इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत देखील त्याला संधी मिळाली नाही. एकदिवसीय संघात पुनरागमन करीत लेगस्पिनर म्हणाला की, आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कपकडे आपले लक्ष वेधण्यापूर्वी त्याचे संपूर्ण लक्ष श्रीलंकेविरूद्ध आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेवर आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे स्थगित करण्यात आलेल्या स्पर्धेचे उर्वरित 31 सामने युएई येथे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात खेळले जाणार आहेत. “गेल्या वर्षभरापेक्षा कमी क्रिकेट होते पण ते आमच्या हातात नाही. कोणतीही मालिका होते, आम्हाला कामगिरी करायची आहे. मग माझे लक्ष आयपीएल आणि त्यानंतर वर्ल्ड टी-20 असेल.”

भारत अनुक्रमे 13, 16 आणि 18 जुलै रोजी तीन एकदिवसीय सामने खेळणार असून त्यानंतर 21, 23 आणि 25 जुलै रोजी टी-20 सामने खेळणार आहे. विशेष म्हणजे सर्व सामने कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जातील. नियमित कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी ब्रिटन दौऱ्यावर असल्याने अनुभवी फलंदाज शिखर धवन श्रीलंकेतील भारतीय संघाचे नेतृत्व करेल.