IND vs SL 1st Test: मोहाली कसोटीत विराट कोहली याला अशा मोठ्या विक्रमाची संधी जो कोणत्याही भारतीय फलंदाजाला आतापर्यंत नाही जमला
अशा परीस्थितीत विराट शतक झळकावून आपली 100वी कसोटी अधिक संस्मरणीय बनवायच्या प्रयत्नात असेल. आतापर्यंत तब्ब्ल 11 भारतीय 100 कसोटी सामने खेळले आहेत, पण कोणीही यामध्ये शतकी कामगिरी करू शकले नाहीत.
Virat Kohli 100th Test: मोहाली (Mohali) येथे श्रीलंका (Sri Lanka) संघाविरुद्ध 4 मार्चपासून दोन सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासह भारतीय क्रिकेट एका नव्या युगात प्रवेश करेल. 34 वर्षीय रोहित शर्मा प्रथमच कसोटी कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे, तर 33 वर्षीय माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सात वर्षांनंतर फक्त फलंदाज म्हणून कसोटी सामन्यात प्रवेश करणार आहे. अशाप्रकारे हा कसोटी सामना रोहितसाठी संस्मरणीय असेल, तसेच तो विराट याच्यासाठी देखील विशेष असेल, कारण विराटच्या कारकिर्दीतील हा 100 वा कसोटी सामना असेल. अशा परीस्थितीत विराट मोहालीत शतक झळकावून आपली 100वी कसोटी अधिक संस्मरणीय बनवायच्या प्रयत्नात असेल. विराटने त्याचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या दिवस/रात्र कसोटीत केले. (IND vs SL Test 2022: श्रीलंकेला टी-20 मालिकेत एकहाती धूळ चारलेला धाकड भारतीय फलंदाज आता कसोटीत देखील करणार कहर, दिग्गज खेळाडूची घेणार जागा)
तेव्हापासून विराटने 15 कसोटी सामन्यांच्या 27 डावात एकही शतकी खेळी केली नाही. यादरम्यान त्याने केवळ सहा अर्धशतके झळकावली असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 79 धावा आहे. तसेच त्याची फलंदाजीची सरासरीही केवळ 28.14 राहिली आहे. दुसरीकडे, तिन्ही फॉरमॅट बद्दल बोलायचे तर अखेरच्या शतकापासून विराटने 61 सामन्यांच्या 70 डाव खेळले आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 94 धावा आहे. यादरम्यान त्याने 38.04 च्या सरासरीने 24 अर्धशतके झळकावली आहेत. अशा परिस्थतीत जर विराट आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात जर शतकी खेळी करण्यात यशस्वी झाल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा कमाल करणारा तो एकूण 10 वा तर पहिला भारतीय फलंदाज ठरेल. आतापर्यंत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांच्यासह तब्ब्ल 11 भारतीय खेळाडूंनी 100 कसोटी सामन्यांचा पल्ला गाठला आहे, पण कोणीही यामध्ये शतकी कामगिरी करू शकले नाहीत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा खराब रेकॉर्ड प्रदीर्घ काळापासून सुरु असूनही विराटच्या नावावर कसोटीत 27 शतके आहेत. आजही त्याची कसोटी फलंदाजीची सरासरी 50.39 आहे, तर तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याची सरासरी 54.30 आहे. विराटची शतके आणि सरासरी दाखवते की तो किती मोठा फलंदाज आहे आणि आता जेव्हा तो त्याच्या 100 व्या कसोटीत प्रवेश करेल तेव्हा त्याला स्वतःचा शतकाचा दुष्काळ संपवायच्या निर्धारित असेल. तसेच नेतृत्वाची जबाबदारी नसल्याने आता तो मोकळेपणाने फलंदाजी करू शकतो.