IND vs SL 1st T20I: ईशान किशन की ऋतुराज गायकवाड, सलामीसाठी कोण असणार पहिली पसंत; Rohit Sharma पुन्हा करणारा टीम इंडियात मोठा उलटफेर?
त्यामुळे आता श्रीलंकेविरुद्ध रोहित पुन्हा एकदा संघात मोठा उलटफेर करून ईशान किशन आणि ऋतुराजच्या जोडीला सलामीला उतरवून स्वतः ‘वन-डाऊन’ येणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
IND vs SL 1st T20I: वेस्ट इंडिज संघावर मर्यादित षटकांच्या मालिकेत वर्चस्व गाजवल्यावर भारतीय संघ (Indian Team) आता श्रीलंका संघाचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात तीन टी-20 आणि दोन कसोटी सामने होणार असून, मालिकेतील पहिला सामना आज लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी विराट कोहली, ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूर या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे व त्यामुळे ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) व श्रेयस अय्यर या खेळाडूंना क्षमता दाखवण्याची आणखी एक संधी मिळेल. दोघे विंडीजविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात अपयशी ठरले, परंतु त्यांना आशा आहे की ते श्रीलंकेविरुद्ध प्रभाव पाडतील. पण पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मापुढे (Rohit Sharma) एक मोठा प्रश्न असेल आणि तो म्हणजे की सलामीला कोणती जोडी उतरणार? (IND vs SL: रोहित शर्मा म्हणाला भारतीय क्रिकेटच्या भविष्यात ‘या’ खेळाडूंची भूमिका महत्त्वाची, संजू सॅमसन T20 विश्वचषकच्या शर्यतीत)
विंडीजविरुद्ध तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) ऋतुराज गायकवाडला संघात फक्त संधीच दिली नाही तर त्याला सलामीला देखील उतरवले आणि स्वतः कर्णधार रोहित चौथ्या क्रमांकावर उतरला. त्यामुळे आता श्रीलंकेविरुद्ध रोहित पुन्हा एकदा संघात मोठा उलटफेर करून ईशान किशन (Ishan Kishan) आणि ऋतुराजच्या जोडीला सलामीला उतरवून स्वतः ‘वन-डाऊन’ येणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाला हा निर्णय घेणे नक्कीच कठीण जाईल कारण मधल्या फळीत सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार यादव देखील मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे मधल्या फळीला बळकट बनवण्यासाठी संघाला एका अनुभवी खेळाडूची गरज आहे. अशा परिस्थितीत ईशान किशनला मधल्या फळीत पाठवून ऋतुराज सोबत रोहित शर्माला सलामीला उतरण्याचा मोठा निर्णय घेणे भाग पडू शकते.
याशिवाय श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिकेतून अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील पुनरागमन करतील. जडेजा दुखापतीमुळे दोन महिने बाहेर बसला होता तर बुमराहला विंडीजविरुद्ध आराम देण्यात आला होता. दुसरीकडे, श्रीलंकेबद्दल बोलायचे झाले तर संघाला ऑस्ट्रेलियाकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला आणि वेळोवेळी निराशाजनक फलंदाजीमुळे संघाचा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे कर्णधार दासुन शनाकाने विश्वास दाखवला आणि म्हटले की फलंदाजी संघाने एकत्र काम केले तर ते टीम इंडियाला लढा देण्यास सक्षम आहेत.