IND vs SA Tests 2021-22: भारत कसोटी संघात Cheteshwar Pujara चे स्थान धोक्यात, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ‘हे’ धाकड फलंदाज बनू शकतात नंबर 3 चे दावेदार

कसोटी क्रिकेटमध्ये पुजाराच्या फलंदाजीच्या क्षमतेवर कोणतीही शंका नाही आहे. मात्र, मागील काही मालिकेत पुजारा बॅटने छाप पाडण्यात अपयशी ठरला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाच्या ताफ्यात असे काही खेळाडू आहेत जे पुजाराच्या जागी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यासाठी शर्यतीत आहेत.

चेतेश्वर पुजारा (Photo Credit-PTI)

IND vs SA Tests 2021-22: चेतेश्वर पुजारा भारतीय कसोटी संघाचा (India Test Team) गेल्या अनेक वर्षांपासून महत्वाचा सदस्य राहिला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पुजाराच्या फलंदाजीच्या क्षमतेवर कोणतीही शंका नाही आहे. पुजारा पदार्पणापासूनच भारतीय संघाचा एक स्टार खेळाडू राहिला आहे आणि त्याला राहुल द्रविडनंतर ‘वॉल ऑफ द इंडियन क्रिकेट’ मानले जाते. मात्र, मागील काही मालिकेत चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) बॅटने छाप पाडण्यात अपयशी ठरला. त्यामुळे संघातील त्याच्या जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका  (South Africa) यांच्यात 26 डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. यापूर्वी ‘कसोटी क्रिकेट तज्ञ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुजाराच्या कसोटी संघातील स्थानाला धोका निर्माण होताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) टीम इंडियाच्या ताफ्यात असे काही खेळाडू आहेत जे पुजाराच्या जागी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यासाठी शर्यतीत आहेत. (IND vs SA Test 2021-22: अजिंक्य रहाणेला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्लेइंग XI मध्ये स्थानासाठी ‘या’ खेळाडूकडून मिळतंय आव्हान)

1. हनुमा विहारी

सप्टेंबर 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी फॉरमॅटमध्ये पदार्पण केल्यापासून, विहारी भारताच्या कसोटी सेटअपचा कायमचा सदस्य होता. विहारीच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर तो चेतेश्वर पुजाराच्या जागी तिसऱ्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. टीम इंडियाचा विश्वासार्ह फलंदाज विहारी अनेकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये असतो आणि बाहेर होत राहिला आहे. 27 वर्षीय विहारीने आतापर्यंत खेळलेल्या 12 कसोटी सामन्यात 32.84 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत. कसोटी तज्ञ पुजाराच्या धावांचा दुष्काळ संपण्याचे नाव घेत नाहीये. अशा स्थितीत त्याची कसोटी कारकीर्द आता संपण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते.

2, प्रियांक पांचाळ

प्रियांक पांचाळ देशांतर्गत क्षेत्रातील एक प्रसिद्ध खेळाडू आहे. प्रियांक 2016-17 रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या प्रभावी कामगिरीने चर्चेत आला. 31 वर्षीय खेळाडूने देशांतर्गत संघ गुजरातला जेतेपद पटकावण्यास महत्वाची भूमिका बजावली. 2008 मध्ये सुरू झालेल्या आपल्या देशांतर्गत कारकिर्दीत, त्याने 45.6 च्या सरासरीने आणि 52.7 च्या स्ट्राइक रेटने तब्बल 6891 धावा केल्या आहेत. प्रियांकने भारतासाठी अद्याप पदार्पण केले नसले तरी, 31 वर्षीय खेळाडू निश्चितपणे इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यास पात्र आहे.

3. श्रेयस अय्यर

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रेयस अय्यरचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. पुजाराची फ्लॉप फलंदाजी लक्षात घेता अय्यरवर दाव लावला जाऊ शकतो. श्रेयसने गेल्या महिन्यातच न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि पदार्पणातच धडाकेबाज शतक झळकावून ते संस्मरणीय बनवले. निवड समितीने श्रेयसचा समावेश करून पुजाराचे कसोटी संघात स्थान निश्चित करण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलले आहे. अय्यर मधल्या फळीत फलंदाजी करू शकतो आणि त्याच्याकडे डाव विणण्याची कलाही आहे. यामुळेच नवीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वात संघ व्यवस्थापन अय्यरला रेड-बॉल क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त संधी देऊ पाहत असेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif