IND vs SA T20 Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 साठी अशी असू शकते भारताची प्लेइंग 11

अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: PTI)

IND vs SA T20 Series: टीम इंडिया (Team India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका 9 जूनपासून सुरू होत आहे. बीसीसीआयने (BCCI) गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. या मालिकेत अनेक अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर 18 सदस्यीय संघात अनेक युवा आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तसेच संघाची कमान केएल राहुलकडे (KL Rahul) सोपवण्यात आली आहे. तर ऋषभ पंतला (Rishabh Pant) उपकर्णधारपद देण्यात आले आहे. दिनेश कार्तिकची अलीकडची कामगिरी पाहता त्याला टी-20 संघातही स्थान देण्यात आले आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना 9 जून रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. (IND vs SA Series 2022: हार्दिक पांड्याने वाढवली टीम इंडियाची डोकेदुखी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 अष्टपैलू खेळाडूंपैकी कोणाला मिळणार संधी?)

टीम इंडियामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारख्या दिग्गजांना विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारत या धुरंधर खेळाडूंसह मैदानात उतरू शकते. टीम इंडियाचा कर्णधार राहुलने आयपीएल 2022 मध्ये जबरदस्त फलंदाजी केली आहे. पहिल्या टी-20 सामन्यात ईशान किशन केएलसोबत डावाची सुरुवात करताना दिसेल. तसे श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार आहे. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर दीपक हुडाचे खेळणेही जवळपास निश्चित असून टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या अष्टपैलू आणि फिनिशरच्या भूमिकेत दिसेल. याशिवाय अक्षर पटेल संघाचा दुसरा अष्टपैलू खेळाडू असू शकतो, जो फिरकी गोलंदाजीतही चांगले योगदान देऊ शकतो. युजवेंद्र चहल संघाच्या स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाजाच्या भूमिकेत दिसणार आहे. भुवनेश्वर कुमार व्यतिरिक्त, वेगवान गोलंदाजांची विभागात हर्षल पटेल आणि आवेश खान यांना संधी दिली जाऊ शकते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

केएल राहुल (कर्णधार), ईशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि आवेश खान.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif