IND vs SA Series 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी असा असेल भारताचा प्लेइंग 11; पाहा कोण होईल IN, कोण OUT

नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्याने केएल राहुलच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिकने मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन केले आहे तर, उमरान मलिक व अर्षदिप सिंह यांना आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरीचे फळ मिळाले आहे.

भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs SA Series 2022: इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या अखेरीस आणखी फक्त 2 सामने शिल्लक आहेत. या लीगनंतर लगेचच टीम इंडियाला (Team India) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाथी मैदानात उतरनार आहे. मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत कर्णधार केएल राहुल (KL Rahul) कोणत्या 11 खेळाडूंना टी-20 मालिकेत खेळण्याची संधी देणार, तर त्याच्या सोबत सलामीला कोणता फलंदाज उतरणार, विराटच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार? हे पाहणे विशेष ठरणार आहे. आयपीएलनंतर होणाऱ्या या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यासह ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. रोहितच्या अनुपस्थितीत राहुलकडे संघाची कमान सांभाळेल. (IND vs SA Series 2022: राहुल द्रविडचा शिखर धवनला फोन, भारताच्या टी-20 संघात का निवडले नसल्याचे सांगितले कारण!)

पहिल्या टी-20 सामन्यात सलामी जोडीबद्दल बोलायचे तर राहुलसोबत ईशान किशन मैदानात उतरण्याचा प्रबळ दावेदार आहे. ऋतुराज गायकवाडही संघात आहे, पण डाव्या-उजव्या जोडीनुसार ईशानला पहिले प्राधान्य दिले जाईल. राहुल सध्या अप्रतिम फॉर्ममध्ये आहे आणि त्याने आयपीएल 2022 मध्ये 500 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ईशानही लयीत परतला आहे. तसेच विराटच्या जागी तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा दावेदार श्रेयस अय्यर असेल. हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर येण्याची खात्री आहे. हार्दिक अनेक महिन्यांनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन करत आहे आणि त्याने आयपीएल 2022 मध्ये चौथ्या क्रमांकावर अप्रतिम फलंदाजी केली. त्याचबरोबर ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर येईल आणि तो संघाचा यष्टिरक्षकही असेल.

दिनेश कार्तिक सहाव्या क्रमांकावर फिनिशर म्हणून दिसू शकतो. कार्तिक आयपीएल 2022 चा सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून उदयास आला आहे. आणि आगामी टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून एक गोष्ट स्पष्ट आहे की कार्तिकच्या खेळाकडे करडी नजर असेल. त्याचवेळी अक्षर पटेल फिरकी गोलंदाज अष्टपैलू म्हणून खेळू शकतो. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलही, ‘कुलचा’ जोडी एकत्र खेळू शकते. दोघांनी आयपीएल 2022 मध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याचबरोबर हर्षल पटेल आणि उमरान मलिक हे संघाचे दोन वेगवान गोलंदाज असू शकतात. गरज भासल्यास हार्दिकही वेगवान गोलंदाजी करू शकतो.

दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी टीम इंडिया

केएल राहुल (कर्णधार ), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीप), हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.