IND vs SA: सात महिन्यात चौथ्यांदा तडाखेबाज खेळाडू टीम इंडिया ‘बाहेर’, नियमित कर्णधार बनण्याचे स्वप्नांना तडा बसणार?

मात्र, या सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. रोहित शर्माच्या जागी या मालिकेसाठी कर्णधार म्हणून निवडण्यात आलेला केएल राहुल दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला असून गेल्या 7 महिन्यांत चौथ्यांदा दुखापतीमुळे त्याने मालिकेतून माघार घेतली आहे.

केएल राहुल (Photo Credit: PTI)

IND vs SA Series 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी-20 मालिकेतील (South Africa Series) पहिल्या सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाचा कर्णधार करण्यात आलेला केएल राहुल (KL Rahul) देखील दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. पण, दुखापतीमुळे राहुलला मालिकेतून माघार (KL Rahul Injury) घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या 7 महिन्यांत तो दुखापतीमुळे 4 वेळा भारतीय संघाबाहेर पडला होता आणि 4 मालिकेत तो टीम इंडियाचा भाग नव्हता. त्यामुळे निवड समिती आणि बीसीसीआयची (BCCI) चिंता वाढली आहे. वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे तो खेळाडू आणि कर्णधार म्हणून कमी विश्वासार्ह बनला आहे. (IND vs SA Series 2022: दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर पडल्याने KL Rahul चे मन दुखावले, भावनिक पोस्टमध्ये लिहिल्या या गोष्टी...)

आणखी एका दुखापतीने केएल राहुलचे नाव रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा यांच्यासह सर्वाधिक जखमी झालेल्या खेळाडूंच्या यादीत सामील झाले असून हे टीम इंडियासाठी चांगले लक्षण नाही. कारण राहुलकडे भविष्याचा कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. पण, तो वारंवार जखमी होत असून ही गोष्ट त्याच्या विरुद्ध जाऊ शकते. याशिवाय निवडकर्त्यांसाठीही हा चिंतेचा विषय बनू शकतो. राहुल दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला असून त्याचा इंग्लंड दौराही अडचणीत येऊ शकतो. आता राहुलला दुखापतीतून सावरण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जावे लागणार आहे. जेणेकरून तो इंग्लंड दौऱ्यासाठी फिट होईल. इंग्लंड दौऱ्यावर भारताला एका कसोटीव्यतिरिक्त 3 टी-20 आणि तितकेच एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.

केएल राहुल कधी जखमी झाला?

नोव्हेंबर 2021: डाव्या मांडीवर ताण आल्याने केएल राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला.

फेब्रुवारी 2022: वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान केएल राहुलला दुखापत झाली, ज्यामुळे तो 3 टी-20 मालिका खेळू शकला नाही.

फेब्रुवारी 2022: हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून राहुल पूर्णपणे बरा होऊ शकला नाही. या कारणास्तव तो फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्धच्या 3 टी-20 मालिकेतून बाहेर पडला होता.

मार्च 2022: या दुखापतीमुळे राहुल मार्च 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळू शकला नाही.