IND vs SA Test Squad: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टेस्ट संघात केएल राहुल याला वगळले, शुभमन गिल याला संधी; रोहित शर्मा करणार ओपनिंग
अपेक्षेप्रमाणे केएल राहुलला वगळण्यात आले आहे तर शुभमन गिलला जागा घेण्यात आली आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की एकदिवसीय आणि टी-20 सलामीवीर आणि उपकर्णधार रोहित शर्माची कसोटीत खेळण्याची प्रतीक्षा संपली आहे.
दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध टेस्ट मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची (Indian Team) घोषणा केली आहे. विराट कोहली संघाचे नेतृत्व करेल तर के एल राहुल (KL Rahul) याला वगळण्यात आले आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट मालिकेत राहुल प्रभावी खेळी करू शकला नाही. वेस्ट इंडीज दौर्यावरही त्याने दोन कसोटी सामन्यांच्या चार डावात अनुक्रमे 44, 38, 13 आणि 6 धावा केल्या होत्या. यानंतर बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी केएल राहुलच्या जागी कसोटी क्रिकेटमध्ये सलामीची जबाबदारी सोपविण्यात येईल असे विधान करून हे स्पष्ट केले. सौरव गांगुली, अॅडम गिलक्रिस्ट, दिलीप वेंगसरकर यांच्यासह इतर अनेक माजी क्रिकेटपटूंनीही रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये सलामीचा सल्ला दिला होता. राहुलच्या जागी युवा खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) याला संघात स्थान देण्यात आले आहेत. गिलने विंडीज आणि सध्या दक्षिण आफ्रिकाविरुद्ध अनौपचारिक मॅचमध्ये उत्तम प्रदर्शन केले होते. ज्याने त्याला संघात स्थान मिळवून दिले. राहुलला संघात स्थान न देण्याने हे स्पष्ट झाले आहे की वनडे आणि टी-20 सलामीवीर आणि उपकर्णधार रोहित शर्मा याची कसोटीत खेळण्याची प्रतीक्षा संपली आहे.
मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद म्हणले की, त्यांना रोहितला कसोटीमध्ये डावाची सुरुवात करण्याची संधी द्यायची आहे." मागील अनेक दिवसांपासून रोहितला मर्यादित षटकांप्रमाणे टेस्टमध्ये देखील सलामीला पाठवावे अशी इच्छा व्यक्त केली जात होती. आणि आता त्यांची ही इच्छा पूर्ण होताना दिसतेय. त्याशिवाय संघात कोणतेही बदल केले गेले नाहीत आणि वेस्ट इंडीज दौर्यावर गेलेल्या फक्त खेळाडूंना संघात कायम ठेवण्यात आले आहे.
दुसरीकडे, आर अश्विन, कुलदीप यादव यांच्यासह रवींद्र जडेजा यांच्यावर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असेल. वेगवान गोलंदाजीत इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी ही जबाबदारी स्वीकारतील. हार्दिक पंड्या संघात स्थान मिळविण्यात अपयशी ठरला आहे. तर, रिषभ पंत यांच्यासह रिद्धिमान साहा याला यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. फलंदाजीसाठी रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, पंत आणि सहा हे संघात आहेत.
असा आहे भारतीय संघ: विराट कोहली (कॅप्टन), मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, रिद्धिमान सहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि शुभमन गिल.