IND vs SA 3rd Test, Cape Town Weather: केप टाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर पाऊस बनणार खलनायक? जाणून घ्या संपूर्ण पाच दिवसाच्या हवामानाचा अंदाज

11 ते 15 जानेवारी दरम्यान केप टाउनच्या न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंडवर तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. तथापि तिसऱ्या कसोटीत पावसाचा व्यत्यय विशेषतः पहिल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (11 जानेवारी) पाहायला मिळू शकतो.

IND विरुद्ध SA केप टाउन हवामान 2022 (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SA 3rd Test, Cape Town Weather: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका  (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) वर्चस्व गाजवले तर दुसऱ्या सामन्यात यजमान संघाने लढा देत रोमहर्षक विजय मिळवला. अशा परिस्थितीत आता कोणता संघ मालिका काबीज करते याबाबत केप टाउन (Cape Town) येथे निर्णय लागू शकतो. 11 ते 15 जानेवारी दरम्यान  केप टाउनच्या न्यूलँड्स (Newlands) क्रिकेट ग्राउंडवर तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघाला इतिहास रचण्याची सुवर्ण संधी आहे. तिसर्‍या कसोटीतील विजयामुळे ते दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. तथापि जोहान्सबर्गप्रमाणेच, तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटीत देखील केप टाउन येथेही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (India Likely Playing XI Cape Town Test: केप टाउन कसोटीसाठी भारतीय ताफ्यात होणार मोठा बदल, दोन खेळाडूंचा होऊ शकतो पत्ता कट!)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीत पावसाचा व्यत्यय विशेषतः पहिल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (11 जानेवारी) पाहायला मिळू शकतो. याशिवाय आर्द्रता देखील खूप जास्त असण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे या कसोटी सामन्यात पावसाची शक्यता जास्त राहू शकते. हवामानाशी संबंधित वेबसाइट Accuweather.com नुसार केप टाउनमध्ये सामन्याच्या पहिल्या दिवशी ढगाळ वातावरणासह पावसाचीही शक्यता आहे. पावसामुळे पहिल्या सत्रातील खेळ म्हणजेच दुपारच्या जेवणापूर्वीचा खेळ खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र त्यानंतर हवामान साफ होईल. सामन्याच्या अन्य दिवसाच्या हवामानाच्या अंदाजाबद्दल बोलायचे तर 11 जानेवारी रोजी पावसाची 64 टक्के शक्यता आहे. यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी, 12 आणि 13 जानेवारी रोजी, पावसाची शक्यता नाही. चौथ्या दिवशी 14 जानेवारीला केवळ एक टक्का पाऊस अपेक्षित आहे. तर 15 जानेवारी, म्हणजेच पाचव्या दिवशी केवळ 19 टक्क्यांपर्यंत पावसाची शक्यता आहे. अशाप्रकारे सामन्याचा पहिला दिवस वगळता उर्वरित चार दिवस हवामान स्वच्छ राहील असे म्हणता येईल.

दरम्यान केप टाउनच्या न्यूलँड्स मैदानावरील खेळपट्टी बहुतेक वेगवान गोलंदाजांना मदत करते. बाऊन्स आणि सीम-मुव्हमेंटमुळे फलंदाजांचे खेळणे कठीण होईल. तसेच न्यूलँड्स हे काही मैदानांपैकी एक आहे जे फिरकीपटूंनाही उपयोगी आहे. त्यामुळे रविचंद्रन अश्विन आणि केशव महाराज यांनाही कसोटी सामन्यात बॉलबे योगदान देण्याची संधी मिळू शकते. न्यूलँड्सचे मैदान एका बाजूला पर्वतांनी वेढलेले आहे. त्यामुळे येथील विकेट वेगवान गोलंदाजांना फायदेशीर ठरते. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांनी 124 तर फिरकी गोलंदाजांनी 34 विकेट घेतल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif