Cape Town Test: केप टाउन कसोटी चेतेश्वर पुजारा-अजिंक्य रहाणेसाठी ठरणार अखेरचा, पुढील मालिकेत ‘या’ फलंदाजांना टीम इंडियात मिळू शकते एन्ट्री
या खराब कामगिरीमुळे पुजारा-रहाणेची कसोटी कारकीर्दही जवळपास संपल्याचे मानले जात आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर टीम इंडियाला मायदेशात श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या कसोटी मालिकेत निवडकर्ते पुजारा-रहाणेचा पत्ता कट करू शकतात.
IND vs SA 3rd Test Day 3: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (Suth Africa) यांच्यात केपटाउनच्या (Cape Town) न्यूलँड्स मैदानावर तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. यावेळी भारतीय संघाला (Indian Team) दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे. सध्या दोन्ही संघात तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला असून तिसरा दिवस टीम इंडिया फलंदाजांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव पुढे देण्यास सुरुवात केली. पण दिग्गज फलंदाज पुजारा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आणि दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर पॅव्हिलियनमध्ये परतला. त्यानंतर माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) देखील पुढील षटकांत एका धावेवर बाद झाला. (Team India प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ‘या’ दोन खेळाडूंना ‘वेटिंग लिस्ट’मध्ये ठेवले, कसोटी सामन्यात नियमित संधींसाठी आता करावी लागणार प्रतीक्षा)
पुजारा आणि रहाणेवर अनेक काळापासून दबाव बनला आहे. त्यामुळे हा सामना दोघांसाठी महत्वपूर्ण होता. पण पुन्हा एकदा दोघे संघ अडचणीत असताना प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. अशा परिस्थितीत न्यूलँड्स येथे सुरु असलेला कसोटी सामना दोंघाचा अखेरचा ठरू शकतो. या सततच्या खराब कामगिरीमुळे पुजारा-रहाणेची कसोटी कारकीर्दही जवळपास संपल्याचे मानले जात आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर टीम इंडियाला 25 फेब्रुवारीपासून मायदेशात श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार खेळायची आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेसाठी निवडकर्ते पुजारा आणि रहाणेकडे दुर्लक्ष करू शकतात. पुजारा बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे तर रहाणे देखील संघर्ष करत आहे. अशा स्थितीत पुजारा आणि रहाणे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बसत नाही.
श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत पुजाराच्या जागी हनुमा विहारी आणि रहाणेच्या जागी श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. टीम इंडियाचा विश्वासार्ह फलंदाज विहारी अनेकदा संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आत आणि बाहेर होत असतो. पुजाराच्या जागी विहारीला तिसऱ्या क्रमांकावर तर श्रेयस अय्यरला पाचव्या स्थानावर खेळवले जाऊ शकते. 28 वर्षीय विहारीने 13 कसोटी सामन्यात 684 धावा केल्या आहेत. मात्र अय्यरने नुकतीच आपली कसोटी कारकीर्द सुरु केली असली तरी त्याचे फलंदाजी कौशल्य न्यूझीलंडविरुद्ध पहिले गेले आहे. अशा स्थितीत या दोन अनुभवी खेळाडूंच्या जागी टीम इंडियात वरील युवा खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो.