IND vs SA 3rd Test Day 2: ‘बूम बूम बुमराह’च्या विकेटचे ‘पंचक’, दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात 210 धावांत गारद; भारताकडे 13 धावांची नाममात्र आघाडी

भारताने पहिल्या डावात 223 धावा केल्या होत्या त्यामुळे टीम इंडियाला आता 14 धावांची नाममात्र आघाडी मिळाली आहे. कीगन पीटरसनने सर्वाधिक 72 धावा केल्या. तर भारतासाठी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 2: भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर ‘विराटसेने’ने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पहिला डाव 210 धावांत गुंडाळला आहे. भारताने (India) पहिल्या डावात 223 धावा केल्या होत्या त्यामुळे टीम इंडियाला आता 13 धावांची नाममात्र आघाडी मिळाली आहे. कीगन पीटरसनने (Keegan Pietersen) सर्वाधिक 72 धावा केल्या. तर टेंबा बावुमाने 28 आणि केशव महाराजने 25 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, भारतासाठी जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.