IND vs SA 3rd Test 2019: ड्रेसिंग रूममध्ये झोपल्यामुळे रवि शास्त्री झाले ट्रोल; 10 करोड रुपये कमावण्यासाठी सर्वोत्तम Job, यूजर्सने दिल्या प्रतिक्रिया

या सामन्यातशिक्षक रवि शास्त्री यांना ट्रोल केले जात आहे. कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी शास्त्री ड्रेसिंगरूम मध्ये झोपत असतानाच फोटो व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर यूजर्सना त्यांना ट्रोल करण्याची संधी मिळाली.

रवि शास्त्री (Photo Credit: Twitter)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात रांचीमध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा शेवटचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे तर दुसरीकडे प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांना मात्र ट्रोल केले जात आहे. तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 162 धावांवर ऑल आऊट केल्यावर भारताने दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन दिला. इथेही भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांना उघडपणे खेळण्याची संधी दिली नाही आणि दिवसाखेर 132 धावांवर 8 विकेट घेत संघाचा विजय निश्चित केला. यादरम्यान, मुख्य प्रशिक्षक शास्त्रींचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि यूजर्सने मिळालेली संधी हातातून सोडली नाही आणि त्यांना ट्रोल करायचे सुरु केले. (IND vs  SA 3rd Test: दक्षिण आफ्रिका संघ एक डाव आणि 202 धावांनी पराभूत, 3-0 क्लीन-स्वीप करत टीम इंडियाने मिळवला ऐतिहासिक विजय)

कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी शास्त्री ड्रेसिंगरूम मध्ये झोपत असतानाच फोटो व्हायरल  झाला आणि सोशल मीडियावर यूजर्सना त्यांना ट्रोल करण्याची संधी मिळाली. काहींनी शास्त्रींच्या या फोटोवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी त्याच्यावर हटके मिम्सदेखील बनवून व्हायरल केले. एका यूजरने लिहिले की शास्त्री केवळ झोपण्यासाठी 10 कोटी रुपये घेत आहेत, तर एका यूजरने लिहिले की शास्त्री जगातील सर्वात सोयीस्कर नोकरी करतात. पहा शास्त्रींचा 'तो' फोटो:

या प्रकारे सोशल मीडिया यूजर्सने दिल्या शास्त्रींच्या फोटो वर प्रतिक्रिया:

शुबमन गिल: 10 कोटी / वर्ष झोपेसाठी...

उत्कृष्ट 10 कोटींची नोकरी 

RT जर आपल्याला वाटते की वर्षामध्ये 10 कोटी मिळवण्यासाठी ही सर्वोत्कृष्ट नोकरी आहे

जेव्हा आपण आपल्या मोबाइलवर बॉम्बे व्हेलवेट पाहण्याचा प्रयत्न करता

कंडक्टर बोलता तिकीट

मी:

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध नऊ गडी गमावून भारताने पहिला डाव 497 धावांवर घोषित केला होता. यानंतर तिसर्‍या दिवशी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 162 धावांवर लोटांगण घातलं आणि त्यानंतर भारताने यंदाच्या मालिकेत दुसऱ्यांदा फॉलोऑन दिला. पण, आफ्रिकेची स्थिती काही सुधारली नाही आणि चौथ्या दिवशी भारताने आफ्रिकेचा एक डाव आणि 202 धावांनी पराभव करत मालिकेत 3-0 असा क्लीन-स्वीप केला.