IND vs SA 3rd T20I: टॉस जिंकून भारताची पहिले बॅटिंग, टीम इंडियाच्या Playing XI मध्ये कोणताही बदल नाही
आजचा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. या मॅचमध्ये टॉस जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहली याने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडिया (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघ यंदाच्या टी-20 मालिकेत अंतिम वेळा आमने-सामने येण्यास सज्ज आहे. आजचा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. या मॅचमध्ये टॉस जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहली याने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या मॅचसाठी टीम इंडिया आणि आफ्रिका संघात कोणताही बदल केला गेला नाही. पण, आफ्रिका संघात एक बदल झाला आहे. वेगवान गोलंदाज ब्यूरेन हेंड्रिक्स (Beuran Hendricks) संघात परतला आहे. आजच्या सामन्यात एकीकडे टीम इंडिया आजची मॅच जिंकून दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ऐतिहासिक क्लीन-स्वीप मिळवण्याच्या तयारीत असेल. दुसरीकडे, आफ्रिकी संघ सामना जिंकत मालिका ड्रॉ करण्याचा प्रयत्न करेल. (IND vs SA 3rd T20I: Female फॅनने म्हटले 'I Love You' तर रिषभ पंत ने दिले असे रिअक्शन; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल)
आजच्या मॅचमध्ये सर्वांची नजर असेल ती कर्णधार विराट आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यातील लढतीवर. मागील सामन्यात विराटने 72 धावांची खेळी करत रोहितला सर्वाधिक टी-20 धावांच्या यादीत मागे टाकत अव्वल स्थान मिळवले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात रोहित पुन्हा नंबर एक क्रमांक मिळवू शकतो की नाही हे पाहणे रोमांचित असेल. रोहित साध्य विराटच्या नंबर 1 स्थानापासून 8 धावा मागे आहे. शिवाय, युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यावर देखील सर्वांच्या नजरा असतील. मागील काही सामान्यांपासून पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकारांच्या मालिकेत पंतने चाहत्यांना निराश केले होते. पंतच्या निराशाजनक खेळीमुळे टीम इंडियातिल त्याच्या जागेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे, मिळालेल्या संधीचा फायदा त्याला घेता येते की नाही हे पाहणे गरजेचे असेल.
असा आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ:
टीम इंडिया: रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कॅप्टन), रिषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर आणि नवदीप सैनी.
दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (कॅप्टन), रस्सी व्हॅन डर ड्यूसेन (उपकर्णधार), टेंबा बावुमा, जुनिअर डाला, बोर्न फॉर्चून, ब्यूरेन हेंड्रिक्स, रीजा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, ब्युरन हेन्ड्रिक्स, एंडिले फेलुक्वायो, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेझ शमसी आणि जॉर्ज लिंडे.