IND vs SA 3rd ODI: केपटाऊन वनडेत दक्षिण आफ्रिकेचा विश्वविक्रमी विजय, टीम इंडियाचा क्लीन स्वीप करून पाकिस्तानच्या रेकॉर्डची केली बरोबरी
आफ्रिकी संघाने अवघ्या 4 धावांनी विजय मिळवून मालिकेत केएल राहुलच्या भारतीय संघाचा 3-0 असा क्लीन स्वीप केला. राहुल अँड कंपनीचा तिसरा पराभव दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये एका संघाकडून सर्वाधिक व्हाईटवॉश करण्याच्या पाकिस्तानच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे.
केपटाऊनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथे झालेल्या दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि भारत (India) यांच्यातील तिसऱ्या वनडे सामना अत्यंत चुरशीचा ठरला. यजमान संघाने अवघ्या 4 धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत केएल राहुलच्या भारतीय संघाचा (Indian Team) 3-0 असा क्लीन स्वीप केला. भारताविरुद्ध हा विजय Proteas संघासाठी अत्यंत खास ठरला आणि त्यांनी पाकिस्तानच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. पार्लच्या बोलंड पार्कवर बावुमा अँड कंपनीने मालिका सलामीच्या सामन्यात टीम इंडियाचा 31 धावांनी पराभव केला. त्याच मैदानावर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रोटीज संघाने विराट कोहली स्टारर संघाचा पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत अजिंक्य आघाडी घेतली. आणि आता राहुल अँड कंपनीचा तिसरा पराभव दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये एका संघाकडून सर्वाधिक व्हाईटवॉश करण्याच्या पाकिस्तानच्या (Pakistan) विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे. (IND vs SA 3rd ODI: चुरशीच्या सामन्यात टीम इंडियाचा सफाया, तिसऱ्या वनडेत अवघ्या 4 धावांच्या विजयाने दक्षिण आफ्रिकेने 3-0 ने काबीज केली मालिका)
माजी विश्वविजेता पाकिस्तान एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात 20 व्हाईटवॉश (किमान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत) पूर्ण करणारा यापूर्वी एकमेव क्रिकेट संघ होता. आणि आता भारताविरुद्ध या मालिका विजयासह दक्षिण आफ्रिकेने 1992 च्या विश्वविजेत्यांची बरोबरी केली. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेव्यतिरिक्त न्यूझीलंडने अशाच पद्धतीने 16 मालिका जिंकल्या आहेत आणि ब्लॅक कॅप्स ऑस्ट्रेलिया (16) आणि वेस्ट इंडिज (16) यांच्याशी बरोबरीत आहेत. याशिवाय, एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला दोनदा व्हाईटवॉश करणारा दक्षिण आफ्रिका दुसरा संघ ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी 2006 च्या वनडे मालिकेत भारताचा पराभव केला होता. माजी विश्वविजेत्या वेस्ट इंडिजने 1983 मध्ये भारताला मायदेशात माजी विश्वविजेत्या वेस्ट इंडिजने 1983 मध्ये भारताला त्यांच्या दूरच्या दौऱ्यात व्हाईटवॉश केले होते. त्यानंतर कॅरिबियन संघाने 1989 मध्ये मायदेशात अशीच कामगिरी केली होती.
सामन्याबद्दल बोलायचे तर भारताला दौऱ्याचा शेवट गोड करण्याची संधी होती, पण एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने रोमहर्षक सामना 4 धावांनी गमावला. भारताने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 287 धावांपर्यंत मजल मारली. सामन्यात क्विंटन डी कॉकने दमदार शतक झळकावले. आफ्रिकी संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा भारताने खूप प्रयत्न केला, पण संघ 4 धावांनी पिछाडीला आणि 49.2 षटकात गारद झाला.