IND vs SA 2nd Test: KL Rahul बनला भारताचा 34वा कसोटी कर्णधार, टीम इंडियात एकावेळी कधीच निश्चित नव्हते स्थान; जाणून घ्या ‘कर्णधार’ बनण्याचा प्रवास

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत राहुल टीम इंडियाची कमान सांभाळणार आहेच मात्र जोहान्सबर्ग येथे दुसऱ्या कसोटी सामन्यातून नियमित कर्णधार विराट कोहली बाहेर पडल्यामुळे उपकर्णधार म्हणून राहुलच्या हाती संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.

केएल राहुल (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SA 2nd Test Day 1: केएल राहुल (KL Rahul) भारतीय क्रिकेट विश्वातील (Indian Cricket) एक मोठा खेळाडू बनला आहे. त्याची 7 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली असेल पण त्याच्या कामगिरीची यादी बरीच मोठी आहे. त्याच्या याच क्रीडा वैशिष्ट्यांमुळेच आता निवड समितीने त्याला टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) वनडे मालिकेत राहुल टीम इंडियाची कमान सांभाळणार आहेच मात्र जोहान्सबर्ग (Johannesburg) येथे दुसऱ्या कसोटी सामन्यातून नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) बाहेर पडल्यामुळे उपकर्णधार म्हणून राहुलच्या हाती संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. नाणेफेकपूर्वी कोहली जोहान्सबर्ग कसोटीत (Johannesburg Test) खेळत नसल्याचे समोर आले. विराटला संघातून वगळण्याचे कारण त्याच्या पाठीत दुखणे असल्याचे सांगितले जात आहे. यासह केएल राहुल कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा 34वा भारतीय खेळाडू ठरला आहे. (Why Virat Kohli Not Playing Johannesburg Test: जोहान्सबर्ग कसोटीतून विराट कोहलीची माघार, ‘या’ कारणामुळे भारतीय कर्णधार दुसऱ्या सामन्याला मुकला)

गेल्या तीन वर्षात राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. राहुलसाठी गेली तीन वर्षे प्रभावी ठरली आहेत. कसोटी सामन्यात कर्णधारपद भूषवणारा राहुल कर्नाटकचा चौथा खेळाडू आहे. यापूर्वी गुंडप्पा विश्वनाथ यांनी 1980 मध्ये 2 कसोटी सामन्यांमध्ये कर्नाटकचे नेतृत्व केले होते, तर टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी 2003 ते 2007 पर्यंत 25 कसोटी सामन्यांमध्ये तर, अनुभवी अनिल कुंबळेने 2007 ते 2008 या कालावधीत 14 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले. राहुल भारतीय संघाच्या आत-बाहेर होत राहिला. तथापि जानेवारी 2019 त्याचा कारकिर्दीत टर्निंग पॉइंट ठरला जेव्हा त्याला आणि हार्दिक पांड्याला ‘कॉफी विथ करण’ या चॅट शो दरम्यान महिलांबद्दल कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल BCCI च्या प्रशासकीय समितीने (COA) ऑस्ट्रेलिया दौऱ्या मधूनच निलंबित केले आणि त्याला घरी परतावे लागले. राहुलने नंतर कबूल केले की 2019 मध्ये घडलेल्या घटनेने त्याचा क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.

दरम्यान रोहित शर्मा दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने राहुल आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी वनडे मालिकेत तो भारतीय संघाचे नेतृत्व करेल. त्याला पुढील कर्णधार म्हणून तयार करण्यासाठी निवडकर्तेही मेहनत घेत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 19, 21 आणि 23 जानेवारी रोजी पार्ल आणि केपटाऊन येथे तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. उल्लेखनीय आहे की राहुलला ICC अंडर-19 विश्वचषक 2010 स्पर्धेत, भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. न्यूझीलंडमध्ये झालेली ही स्पर्धा भारतीय संघासाठी निराशाजनक ठरली आणि संघ सहाव्या स्थानावर राहिला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif