IND vs SA 2nd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेतेश्वर पुजाराची बॅट तळपली, ठोकलं 32 वे कसोटी अर्धशतक; भारताची आघाडी शंभरी पार

IND vs SA 2nd Test Day 3: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. दिवसाच्या सुरुवातीला फॉर्मशी झगडत असलेल्या चेतेश्वर पुजाराची बॅट तळपली आणि त्याने 32 वे कसोटी अर्धशतक झळकावले. पुजाराने या खेळीत 62 चेंडूंचा सामना केला 10 चौकार लगावले. 30 षटकांनंतर भारताचा स्कोर 137/2 असून त्यांच्याकडे 110 धावांची आघाडी आहे.

चेतेश्वर पुजारा (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test Day 3: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात जोहान्सबर्गच्या (Johannesburg) वांडरर्स स्टेडियमवर तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. दिवसाच्या सुरुवातीला फॉर्मशी झगडत असलेल्या चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) बॅट तळपली आणि त्याने 32 वे कसोटी अर्धशतक झळकावले. पुजारा गेल्या काही सामान्यांपासून दडपणाखाली आहे. पुजाराने या खेळीत 62 चेंडूंचा सामना केला 10 चौकार लगावले. पुजाराने अजिंक्य राहणेसह अर्धशतकी भागीदारी करून संघाची आघाडी शंभरी पार पोहचवली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement