IND vs SA 2nd Test: तिसऱ्या दिवशी दमदार अर्धशतकांसह चेतेश्वर पुजारा - अजिंक्य रहाणेने मिटवला ‘PURANE’ वाद, एका खेळीने टीकाकारांची केली बोलती बंद
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने वांडरर्स येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरीस कसोटीच्या तिसऱ्या दिवशी करिअरची पूर्तता करणारे अर्धशतक सिद्ध होऊ शकणाऱ्या अर्धशतकी खेळीसह टीकाकारांना उत्तर दिले. पुजारा-रहाणेच्या फ्लॉप-शो नंतर सोशल मीडियावर ‘PURANE’ असा हॅशटॅग ट्रेंट होऊ लागले होते. नेटकरी दोघांवर निशाणा साधत होते, मात्र दुसऱ्या डावात या हॅशटॅगचा अर्थ पूर्णपणे बदलला.
IND vs SA 2nd Test 2022: भारतीय कसोटी संघाचे तज्ञ फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) अनेक दिवसांपासून टीकेचे पात्र बनले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारतीय संघातून (Indian Team) विराट कोहली बाहेर बसल्यामुळे रहाणे आणि पुजारा या वरिष्ठ फलंदाजांवरील जबाबदारी वाढली होती. तथापि, खराब कामगिरीच्या मालिकेनंतर, रहाणे आणि पुजारा दोघेही पुन्हा एकदा संघाला सर्वाधिक गरज असताना पहिल्या डावात अपयशी ठरले. पुजारा अवघ्या तीन धावांवर बाद झाला, तर रहाणेला भोपळाही फोडू शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या डावात त्यांना स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची गरज होती. आणि यावेळी दोघांनी अपेक्षापूर्ती केली आणि निराश केले नाही. (IND vs SA 2nd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेत Rishabh Pant याचे फ्लॉप सत्र सुरूच, तिसऱ्या कसोटीतून ‘हे’ दोन करू शकतात सुट्टी)
जोहान्सबर्ग कसोटीच्या (Johannesburg Test) दुसऱ्या डावात जबरदस्त दबावात फलंदाजी करणाऱ्या भारतीय फलंदाजांनीही आपल्या समीक्षकांना चोख प्रत्युत्तर देत अर्धशतकं झळकावली. कारकिर्दीची दोघांच्या शतकाची संधी हुकली मात्र हाणे आणि पुजाराच्या फलंदाजीच्या प्रयत्नांनी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. पहिल्या डावात पुजारा-रहाणेच्या फ्लॉप-शो नंतर सोशल मीडियावर ‘PURANE’ असा हॅशटॅग ट्रेंट होऊ लागले होते. नेटकरी याद्वारे दोन्ही ज्येष्ठ फलंदाजांवर निशाणा साधत होते, मात्र दुसऱ्या डावानंतर या हॅशटॅगचा अर्थ पूर्णपणे बदलला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी करून संघाच्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाय रचला. लक्षात घ्यायचे की पुजाराने, ज्यावर अनेकदा हेतू न दाखवल्याबद्दल टीका केली जाते, त्याने यावेळी आक्रमक फलंदाजी केली आणि केवळ 62 चेंडूंपैकी अर्धशतक पूर्ण केले.
#PURANE ने नेहमी अशीच फलंदाजी करावी
पुजारा आणि रहाणे अर्धशतकानंतर...
जुनं ते सोनं!
तो लढाई जिंकला, पण युद्ध आपण जिंकूच!
करिअर रिडीमिंग अर्धशतक!
दुसरीकडे, रहाणेनेही सुरुवातीपासून आपला इरादा स्पष्ट केला आणि चहुबाजूने शॉट खेळले. डीप मिड-विकेटवर मार्को जॅन्सनला मारलेला त्याचा षटकार खरोखरच कौतुकास पात्र होता. पुजारा आणि रहाणे दोघेही कालांतराने कगिसो रबाडाच्या चेंडूवर बळी पडले आणि अनुक्रमे 53 आणि 58 धावा केल्या. दोघे बाद झाल्यानंतर रिषभ पंत देखील शून्यावर झटपट बाद झाला. हनुमा विहारीने एका टोकाला गड राखला असताना संघाने दुसऱ्या टोकाने विकेट्स गमावल्या. मोहम्मद सिराजला बाद करून लुंगी एनगिडीने भारताला दुसऱ्या डावात 266 धावांत गुंडाळले. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेला 240 धावांचे लक्ष्य मिळाले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)