IND vs SA 2nd Test 2019: भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा टेस्ट सामना ठरला ऐतिहासिक, फक्त चार दिवसांमध्ये बनले इतके रेकॉर्ड, वाचा सविस्तर

नुकताच संपुष्टात आलेला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामना रेकॉर्डस्चा राजा बनला, कारण या सामन्यात एक नाही तर 10 पेक्षाही अधिक रेकॉर्डची नोंद करण्यात आली.

भारत-दक्षिण आफ्रिका (Photo Credits: Getty Images)

विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने (Indian Team) तीन सामन्यांची कसोटी मालिका जिंकत दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संघाला सलग दोन कसोटींमध्ये पराभूत केले. भारताने घरच्या मैदानावर खेळताना सलग अकरावी कसोटी मालिका जिंकली. टीम इंडियाने दुसरा कसोटी सामना डावात आणि 137 धावांनी जिंकला. कर्णधार म्हणून कोहलीचा हा 50 वा कसोटी सामना होता. यंदाचा आफ्रिकाविरुद्ध टेस्ट सामन्यात काही नवीन रेकॉर्ड बनले तर, काही मोडण्यात आले. आणि भारताचा कर्णधार कोहलीने सर्वाधिक विक्रम त्याच्या नावावर केले. आफ्रिकाविरुद्ध दुसऱ्या टेस्टमध्ये पहिल्या दिवशी फलंदाजीला येत विराटने विक्रमी 254 धावांची खेळी केली. यादरम्यान, विराटने ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांच्यापासून सचिन तेंडुलकर पर्यंत अनेक क्रिकेटपटूंचे विक्रम मोडून काढले. विराटच्या विक्रमी 200 पेक्षा अधिक धावांमुळे संघाने 601 धावा केल्या. (IND vs SA 2nd Test: दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा डाव आणि 137 धावांनी पराभव, सलग 11 वी मालिका जिंकत टीम इंडियाने मोडला ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड)

दुसरीकडे, विराटशिवाय अन्य खेळाडूंनीदेखील विक्रम आपल्या नावावर केले. चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देणारा विराट पहिला भारतीय कर्णधार बनला. नुकताच संपुष्टात आलेला आफ्रिकाविरुद्ध सामना रेकॉर्डस्चा राजा बनला, कारण या सामन्यात एक नाही तर 10 पेक्षाही अधिक रेकॉर्डची नोंद करण्यात आली. इथे पाहूया कोणते आहेत ते विक्रम:

1. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात कर्णधार म्हणून 40 शतक करणारा विराट कोहली हा पहिल्या भारतीय कर्णधार आहे. माजी ऑस्ट्रेलियाई कर्णधार रिकी पॉन्टिंग याने कर्णधार म्हणून एकूण 41 शतकं केली आहेत.

2. टेस्ट मॅचमध्ये 7 दुहेरी शतकं करणारा पहिला भारतीय. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध दुसऱ्या दिवशी दुहेरी शतक करत विराटने सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना मागे टाकले. सचिन आणि सेहवागने टेस्टमध्ये प्रत्येकी ६ दुहेरी शतकं केली आहेत. शिवाय, विराटने डॉन ब्रॅडमन यांना पिछाडीवर टाकले. ब्रॅडमनने 8 दुहेरी शतकं केली आहेत.

3. कर्णधार म्हणून 50 टेस्ट सामने खेळणारा कोहली दुसरा भारतीय आहे. माजी कर्णधार एमएस धोनी याने सर्वाधिक 60 टेस्ट सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहेत. या रेकॉर्डसह विराटने सौरव गांगुली याला मागे टाकले. गांगुलीने कर्णधार म्हणून 49 टेस्ट सामने खेळले आहेत.

4. आफ्रिकाविरुद्ध दुसऱ्या दिवशी विराटने कर्णधार म्हणून 19 वे टेस्ट शतक केले. यासह त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पॉन्टिंगची बरोबरी केली. पॉन्टिंगने देखील कर्णधार म्हणून 19 टेस्ट शतकं केली आहेत. माजी आफ्रिकी कर्णधार ग्रॅम स्मिथ याने कर्णधार म्हणून सर्वात जास्त 25 टेस्ट शतकं केली आहेत.

5. कोहलीने त्याच्या 254 धावांच्या खेळीदरम्यान टेस्ट कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. यापूर्वी विराटने टेस्टमध्ये श्रीलंकाविरुद्ध 2017/18 मध्ये 243 धावा केल्या होत्या.

6. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध यंदाचे शतक हे विराटचे 26 वे टेस्ट शतक आहे. यासह त्याने माजी पाकिस्तानी कर्णधार इंझमाम-उल-हक यांना पिछाडीवर करत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्स यांची बरोबरी केली. इंझमामने 25 तर स्मिथ आणि सोबर्सने 26 टेस्ट शतकं केली आहेत.

7. कोहलीने कर्णधार म्हणून 9 वेळा 150 पेक्षा अधिक स्कोअर केला आहेत. सर डॉन ब्रॅडमन यांनी या प्रकरणात 8 वेळा 150 पेक्षा अधिक धावा नोंदवल्या आहेत. तिसर्‍या क्रमांकावर ब्रायन लारा, महेला जयवर्धने, ग्रॅमी स्मिथ आणि मायकेल क्लार्क या चारही खेळाडूंनी सात वेळा कर्णधार म्हणून 150 पेक्षा अधिकचा स्कोअर केला आहे.

8. 7,000 धावा करणारा विराट कोहली हा भारताचा सातवा फलंदाज बनला. यापूर्वी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीस लक्ष्मण, सौरव गांगुली, राहुल द्रविड वीरेंद्र सेहवाग यांनी सात हजार धावांचा टप्पा गाठला आहे. यासह विराटने माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांना मागे टाकले. वेंगसरकरने टेस्ट करिअरमध्ये 6868 धावा केल्या आहेत.

9. आफ्रिकाविरुद्ध तुफान खेळी दरम्यान, विराटने सर्वात वेगवान 21,000 धावा करण्याचा विक्रम केला. विराटने 392 सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला, तर सचिन तेंडुलकरने 418 सामन्यात 21 हजार धावा केल्या होत्या.

10. दुसर्‍या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आफ्रिकेला फॉलोऑन दिला. असं करणारा विराट हा भारताचा पहिला कर्णधार बनला. तर, 11 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन मिळाला आहे.

11. भारताविरुद्ध दुसरा टेस्ट मॅचमध्ये केशव महाराज हा आफ्रिकेसाठी 100 टेस्ट विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज ठरला. आफ्रिकासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज फिरकीपटू पॉल अडॅम्स आहेत. त्यांनी कारकिर्दीत 134 विकेट्स घेतल्या आहेत.

12. भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने दक्षिण आफ्रिका संघाचे सहा फलंदाजांना बाद केले. यासह अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये 356 विकेट्स पूर्ण केल्या. यासह अश्विनने डेनिस लिली (Dennis Lillee) आणि माजी श्रीलंका क्रिकेटपटू चमिंडा वास (Chaminda Vaas) यांना मागे टाकले. डेनिस लिली आणि वासने 355 विकेट्स घेतले आहेत.

13. भारतासाठी टेस्टमध्ये 250 किंवा अधिक धावा करणारा विराट हा पाचवा फलंदाज आहे. या यादीत वीरेंद्र सेहवाग पहिल्या स्थानावर आहे, त्याच्या मागे करून नायर, व्हीव्हीस लक्ष्मण, आणि राहुल द्रविड आहे. सेहवागने तीन वेळा (319, 309, 293, 254) 250 किंवा अधिक धावा केल्या आहेत. नायर, लक्ष्मण आणि द्रविड यांनी प्रत्येकी 1-1 वेळा ही कामगिरी केली आहे.

14. घरच्या मैदानावर खेळताना सलग 11 मालिका जिंकणारा भारत पहिला आंतरराष्ट्रीय संघ ठरला. यासह टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या सलग 10 मालिका जिंकण्याचा रेकॉर्ड मोडला.

15. कोणत्याही संघाविरुद्ध डावाने मिळवलेला विराटचा कर्णधार म्हणून 8 वा विजय आहे. यासह त्याने सौरव गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीन यांना मागे टाकले. अझरुद्दीन आणि सौरवने कर्णधाराच्या रूपात घरच्या मैदानावर 7 मालिका जिंकल्या आहेत.

विराटने नुकत्याच संपुष्टात आलेल्या मॅचमध्ये शानदार फलंदाजी केली. सुरुवातीला कगिसो रबाडा याने 3 विकेट घेऊन दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण, विराटने अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा याच्या सोबत शतकी भागीदारी केली आणि संघाला मोठी धावसंख्या करण्यास सहाय्य केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif