IND vs SA 2nd T20I: 'हे' 4 खेळाडू करू शकतात भारत विरुद्ध टी-20 मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकासाठी डेब्यू
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी-20 सामना पावसामुळे धुतला गेल्यावर दोन्ही संघ आता दुसऱ्या मॅचसाथ आमने-सामने येण्यास सज्ज आहे. दक्षिण आफ्रिकाच्या संघात 4 खेळाडू आहेत जे कदाचित भारताविरुद्ध टी -२० मालिकेमध्ये पदार्पण करतील. बावुमा आणि नोर्त्जे यापूर्वी वनडे मॅच खेळले आहेत पण बुधवारी मैदानात उतरल्यास या दोघांचे हे टी-20 क्रिकेटमधील पदार्पण होईल.
भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघातील पहिला टी-20 सामना पावसामुळे धुतला गेल्यावर दोन्ही संघ आता दुसऱ्या मॅचसाथ आमने-सामने येण्यास सज्ज आहे. भारत-दक्षिण आफ्रिकामधील दुसरा टी-20 सामना मोहालीच्या क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मालिकेचा पहिला सामना बुधवारी मोहाली येथे होईल हे बोलणे चुकीचे नाही. धर्मशाळा येथे टॉस न होताच मॅच रद्द करावी लागली. आजच्या मॅचमध्ये सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनवर असतील कारण ते छोट्या फॉर्मेटसाठी परिपूर्ण संयोजन शोधण्याचा प्रयत्न आहे, तर दक्षिण आफ्रिका संघदेखील काही आश्चर्य बदल करेल असे म्हटले जात आहे. (Live Streaming of IND vs SA, 2nd T20I Match: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर)
दक्षिण आफ्रिकाच्या संघात 4 खेळाडू आहेत जे कदाचित भारताविरुद्ध टी -२० मालिकेमध्ये पदार्पण करतील. ज्यात तेम्बा बावुमा, एनरिक नोरजे,जॉर्ज लिंडे, आणि ब्योर्न फोर्टुइन यांना मोहाली येथील दुसर्या टी-20 च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. बावुमा आणि नोर्त्जे यापूर्वी वनडे मॅच खेळले आहेत पण बुधवारी मैदानात उतरल्यास या दोघांचे हे टी-20 क्रिकेटमधील पदार्पण होईल.
तेम्बा बावुमा (Temba Bavuma)
सीएसए टी-20 चॅलेंज 2019 मधील लायन्ससाठी फलंदाजामध्ये बावुमाने प्रभावी योगदान दिले होते. त्याने चॅलेंजमध्ये तिसऱ्या सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने सीएसए टी-20 चॅलेंज 2018/19 मध्ये 326 धावा केल्या होत्या. शिवाय त्याने सीएसए टी-20 चॅलेंजच्या सेमीफायनल मॅचमध्ये लायन्ससाठी 36 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याने त्याचे टी-20 मधील कामगिरी अजून बनवून ठेवली सीएसए टी-20 चॅलेंजच्या अंतिम सामन्यात 61 चेंडूत शतक ठोकले. टी -20 मध्ये 2018/19 च्या हंगामात बावुमाच्या फलंदाजीची सरासरी 37.76 आहे. त्याने मागील काही मॅचमध्ये अर्धशतकी खेळी केली आहे, त्यामुळे भारतविरुद्ध सामन्यात त्याला खेळायची संधी मिळाल्यास तो टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतो यात शंका नाही.
एनरिक नोरजे (Anrich Norje)
नोरजेने केप टाऊन ब्लीट इन इन मॅझन्सी सुपर लीगमध्ये 3 सामन्यांत 8 गडी बाद केले. मोहाली येथील दुसर्या टी-20 सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या इलेव्हनच्या स्पधेर्साठी नोरजे आणि ज्युनियर डाला यांच्यात जोरदार स्पर्धा असेल. डालाचा रोहित शर्मा याच्याविरुद्ध रेकॉर्ड चांगला आहे, पण फलंदाजांना चकित करण्याची नॉर्टजेची वेगवान क्षमता लक्षात घेतल्यास त्याला संधी देण्यात येईल याची शक्यता नाकारता येत नाही. उर्वरित हंगामाच्या तुलनेत 2018/19 च्या मोसमात त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.
जॉर्ज लिंडे (George Linde)
दक्षिण आफ्रिका टी-20 संघात जॉन-जॉन स्मट्सच्या बदली म्हणून लिंडेला स्थान देण्यात आले आहे. सीएसए टी-20 चॅलेंज 2018/19 मध्ये त्याने बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये योगदान दिले आहे. शिवाय, त्याने 132.32 च्या स्ट्राईक रेटने 9 डावांमध्ये 131 धावा केल्या आणि 8.63 च्या इकॉनॉमीने त्याने केप कोब्राससाठी 6 गडी देखील बाद केले आहेत. काही दिवसांपूर्वी भारत-विरुद्ध झालेल्या दुसर्या अनधिकृत वनडे मॅचमध्ये त्याने केवळ 25 चेंडूत जलद 52 धावा केल्या.
ब्योर्न फोर्टुइन (Bjorn Fortuin)
फोर्टुइनने देखील सीएसए टी-20 चॅलेंजमध्ये लायन्ससाठी बॅट आणि बॉलने योगदान दिले आहे. सीएसए टी 20 चॅलेंज 2018/19 मध्ये तो 15 विकेट्स घेणारा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज होता. डॉल्फिनविरूद्ध सेमीफायनल सामन्यात त्याला विकेट मिळाली नाही पण, अंतिम सामन्यात 4 गडी बाद केले. सीएसए चॅलेंजमध्ये (गोलंदाजीच्या 20 मिनिटांत) त्याने 14.33 च्या सर्वोत्कृष्ट सरासरीने गोलंदाजी केली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)