Live Streaming of IND vs SA, 2nd T20I Match: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर
भारत आणि दक्षिण आफ्रिका टी-20 मॅचचं लाइव्ह प्रक्षेपण प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहे. शिवाय, लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे. शिवाय, जर तुम्ही Jio ग्राहक असाल आणि तुमच्याकडे Jio TV हे अॅप असेल तर तुम्ही फोनवर हा सामना मोफत पाहू शकता.
भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघ टी-20 विश्वचषकच्याआधी आमने-सामने येण्यास सज्ज आहे. भारत-आफ्रिकामधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर सर्वांचे लक्ष मोहालीमध्ये होणाऱ्या दुसऱ्या मॅचवर आहे. धर्मशाळा येथे पावसामुळे टॉस न होता सामना रद्द झाला. त्यामुळे आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष मोहाली (Mohali) येथील वातावरणावरआहे. ही मालिका टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे, कारण 2020 ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकच्या दृष्टीनं खेळाडूंकडे चांगली संधी आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकामध्ये तब्बल चार वर्षांनी टी-20 मॅच खेळली जाणार आहे. 2015 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका खेळवण्यात आली होती, तेव्हा भारतीय संघाला 2-0 ने पराभव पत्करावा लागला होता. (Under 19 Asia Cup Final सामन्याचा 'मॅन ऑफ द मॅच' अथर्व अंकोलेकर याची विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेसाठी मुंबई संघात निवड)
टी-20 मॅचचं लाइव्ह प्रक्षेपण प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहे. यात इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि एचडी चॅनेलवर सामना पाहता येईल. शिवाय, लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे. शिवाय, जर तुम्ही Jio ग्राहक असाल आणि तुमच्याकडे Jio TV हे अॅप असेल तर तुम्ही फोनवर हा सामना मोफत पाहू शकता.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकासाठी आगामी मालिका महत्वपूर्ण राहील. विश्वचषकमध्ये निराशाजनक कामगिरीनंतर संघाचा हा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा आहे. यंदा संघाचे नेतृत्वा क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) करणार आहे. टी-20 मालिकेत डी कॉक तर कसोटीसाठी फाफ डुप्लेसी (Faf Du Plessis) याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. भारत दौऱ्यादरम्यान संघाचे मनोबल वाढवण्याचं आव्हान सर्व खेळाडूंकडे असणार आहे. टीम इंडियाने देखील वेस्ट इंडिजविरुद्ध निर्विवाद यश मिळवलं आहे. त्यामुळे, यशाची ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.
(The above story first appeared on LatestLY on Sep 18, 2019 03:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

