Virat Kohli Fitness Update: केप टाऊन कसोटीसाठी विराट कोहली करणार कमबॅक? चेतेश्वर पुजाराने भारतीय कर्णधाराच्या उपलब्धतेवर दिला मोठा अपडेट
पाठीच्या दुखण्यामुळे विराट जोहान्सबर्गमध्ये सुरू असलेल्या सामन्यातून बाहेर बसला आहे. कोहली तंदुरुस्त असल्यास टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात नाबाद 40 धावा करूनही हनुमा विहारीला बाहेर बसावे लागेल.
IND vs SA Test 2022: भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) आपल्या कारकिर्दीतील फक्त तिसऱ्यांदा फिटनेसच्या समस्येमुळे टेस्ट सामन्यातून बाहेर बसावे लागले आहे आणि जोहान्सबर्ग (Johanneburg) येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) सुरु असलेल्या सामन्यात तो याच कारणामुळे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडला. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी कोहलीला नाणेफेकीसाठी बाहेर पडताना पाहण्यासाठी चाहते त्यांच्या टीव्ही स्क्रीनवर चिकटून होते पण जेव्हा उपकर्णधार केएल राहुल बाहेर आला तेव्हा चकित झाले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे पहिल्यांदा नेतृत्व करण्यास सज्ज राहुलने खुलासा केला की कसोटी कर्णधार पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. तथापि तिसर्या दिवसाच्या सुरुवातीला कोहलीला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडकडून थ्रो डाउनचा सामना करताना दिसला. (IND vs SA: तिसऱ्या कसोटीत विराट कोहली ‘या’ फलंदाजाला करणार रिप्लेस; संघर्ष करणाऱ्या रहाणे-पुजाराच्या भविष्यावर भारतीय यष्टीरक्षकाने वर्तवले भाकीत)
चाहते तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी कोहलीच्या खेळण्यावर अधिकृत घोषणेची वाट पाहत असताना, फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) सकारात्मक अपडेट दिला आहे. तिसऱ्या सामन्याचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पुजाराने कोहली तिसऱ्या सामन्यासाठी तंदुरुस्त असल्याचा इशारा दिला आणि म्हणाला: “तो (कोहली) निश्चितच बरा होत आहे आणि मला वाटते की तो लवकरच तंदुरुस्त होईल.” कोहली तंदुरुस्त असल्यास टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात नाबाद 40 धावा करूनही हनुमा विहारीला बाहेर बसावे लागेल. संघ व्यवस्थापन वरिष्ठ फलंदाज पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना पाठीशी घालत आहे व कोहली परतला तरी ते त्यांचे स्थान टिकवून ठेवण्यास सज्ज असतील. पहिल्या डावात 33 चेंडूत केवळ 3 धावा करणाऱ्या पुजाराने दुसऱ्या डावात 61.63 धावा करताना 86 चेंडूत 53 धावा केल्या.पहिल्या डावात पहिल्या चेंडूत शून्यावर बाद झालेल्या रहाणेने 78 चेंडूत जबाबदार 58 धावा केल्या. दोघांनी 111 धावांची शतकी भागीदारी करून पाहुण्या संघाचा डाव सावरला.
सामन्याबद्दल बोलायचे तर डीन एल्गरच्या नाबाद 46 आणि इतर फलंदाजांच्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या सौजन्याने दक्षिण आफ्रिकीने तिसऱ्या दिवशी 118/2 धावसंख्येपर्यंत मजल मारली. यजमान संघ 8 गडी राखून लक्ष्यापासून आणखी 122 धावा दूर आहे. तर लक्ष्य गाठण्यासाठी त्यांच्याकडे 180 षटके शिल्लक आहेत. दुसरीकडे, सामन्यासाठी Proteas दौऱ्यावर पहिली कसोटी मालिका जिंकण्यासाठी आता टीम इंडियाची मदार गोलंदाजांवर जे चौथ्या दिवसाच्या सुरुवातीपासून विकेट घेण्याच्या दडपणात असतील.