IND vs SA: ‘उपकर्णधार झाल्यामुळे तुझे केस पांढरे झाले?’ मयंक अग्रवालच्या मजेशीर प्रश्नावर KL Rahul चे भन्नाट प्रतिक्रया, पहा व्हिडिओ

त्याचा कर्नाटक संघ सहकारीने नंतर मजेशीरपणे विचारले की, टीम इंडियात जबारदारी मिळाली की, केसही पांढरे होतात, हे खरं आहे का? यावर राहुलने देखील हास्यस्पद प्रतिक्रिया दिली.

मयंक अग्रवाल आणि केएल राहुल (Photo Credit: Twitter/BCCI)

बॅकअप सलामीवीर ते उपकर्णधार पर्यंत खेळाच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये केएल राहुल (KL Rahul) साठी गेले 12 महिने अस्पष्ट राहिले आहेत. इंग्लंडमधील यशस्वी कसोटी मालिकेनंतर सलामीवीर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी मालिकेसाठी भारताच्या रेड-बॉल संघाचा उपकर्णधार बनला आहे. 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) दोन्ही संघांमधील कसोटी मालिका सुरू होणार आहे. टीम इंडियाला (Team India) अद्याप दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. मात्र नुकत्याच झालेल्या परदेश दौऱ्यांमध्ये संघाने चांगला खेळ दाखवला आहे. या दौऱ्यावर भारताच्या डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी केएल राहुल आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांच्यावर असेल. या दोघांनी मालिका सुरू होण्यापूर्वी मयंकने राहुलची मुलाखत घेतली ज्यामध्ये या मालिकेबद्दलच्या अपेक्षा आणि तयारीबद्दल चर्चा केली. तसेच एकमेकांच्या प्रवासावर चर्चा केली. (India Playing XI vs SA 1st Test: भारताच्या प्लेइंग इलेव्हनसाठी 10 खेळाडू आहेत तयार, उर्वरित एका जागेसाठी 2 दावेदार; ‘हे’ असून शकतात संभाव्य 11)

बीसीसीआयने (BCCI) त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओ आपल्या वेबसाइटवर पोस्ट केला आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या कसोटी मालिकेसाठी मयंकने राहुलला उपकर्णधारपद मिळण्याबाबत विचारले. राहुलने सांगितले की “6-7 महिन्यांपूर्वी पुन्हा कसोटी कशी खेळायची हे देखील माहित नव्हते. पण गोष्टी झपाट्याने बदलल्या आहेत. उपकर्णधार पद मिळाल्याने आनंद झाला आणि सन्मानीय वाटले. संघासाठी 100 टक्के देईल जसे पूर्वी देत ​​आले आहेत.” मयंकने पुढे मजेशीरपणे विचारले की, टीम इंडियातील जबाबदारीमुळे केसही पांढरे होतात असे म्हणतात. यावर राहुल म्हणाला, “हो, मला काही मिळाले आहे. मला वाटते की ते आयपीएलच्या कर्णधार पदावरून आले आहे. इथे जबाबदारी नाही पण जर ती आली तर मला आनंद होईल. एवढी मोठी जबाबदारी मिळाल्याने भारतीय संघाचा उपकर्णधार होणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. कोणीही ते घेईल आणि सफेद केसांची खरोखर काळजी करणार नाही,” तो म्हणाला.

दरम्यान, कर्नाटक फलंदाजाने आतापर्यंत 40 कसोटी सामन्यांमध्ये 35.17 च्या सरासरीने 2321 धावा केल्या आहेत. उपकर्णधारपदाच्या अतिरिक्त जबाबदारीमुळे 29 वर्षीय खेळाडूकडून बऱ्याच अपेक्षा असतील. लक्षात घ्यायचे की मयंक आणि राहुल कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहेत. दोगांनी एकत्र क्रिकेट कारकीर्दही सुरू केली. त्यानंतर 2014 मध्ये राहुलने टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले. तर अग्रवालला 2018 मढी पहिली संधी मिळाली. विशेष म्हणजे दोघांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी पदार्पण केलेलं आणि दोघांनीही बॉक्सिंग डे म्हणजेच ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी कसोटी कारकीर्द सुरु केली.