IND vs SA 2020: भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिका वनडे टीम जाहीर, फाफ डु प्लेसिस समवेत 'या' खेळाडूंचा झाला समावेश

12 मार्चपासून खेळल्या जाणार्‍या एकदिवसीय मालिकेसाठी फाफ डु प्लेसिस आणि रस्सी वैन डेर ड्यूसेन ने संघात पुनरागमन केले आहे. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला यापूर्वी मालिकेतून वगळण्यात आले आहे. 

फाफ डु प्लेसिस (Photo Credits: Getty Images)

भारत (India) दौर्‍यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकी (South Africa) संघ जाहीर झाला आहे. 12 मार्चपासून खेळल्या जाणार्‍या एकदिवसीय मालिकेसाठी फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) आणि रस्सी वैन डेर ड्यूसेन (Rassie van der Dussen) ने संघात पुनरागमन केले आहे. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला यापूर्वी मालिकेतून वगळण्यात आले असून जॉर्ज लिंडे (George Linde) याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. लेगस्पिनर तबरेज शम्सीला मूल झाल्याने तो अनुपलब्ध असेल. केशव महाराज (Keshav Maharaj) याची दुसरा फिरकीपटू म्हणून निवड करण्यात आणि आहे. कर्णधारपदावरून राजीनामा देणाऱ्या डु प्लेसिसला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या सुरु असणाऱ्या वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून 1-0 ने आघाडी घेतली आहे. (दक्षिण आफ्रिका टीमसाठी मोठा धक्का, ऑस्ट्रेलिया आणि भारतविरुद्ध वनडे मालिकेतून कगिसो रबाडा आऊट)

दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व क्विंटन डी कॉक करणार आहे. मालिकेतील पहिला सामना 12 मार्च रोजी धर्मशाळामध्ये, दुसरा सामना 15 मार्चमध्ये लखनौ, तिसरा आणि अंतिम सामना 18 मार्चला कोलकातामध्ये खेळला जाईल. सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या भारत दौर्‍याच्या कडव्या आठवणी विसरून 27 वर्षीय आफ्रिकी कर्णधार भारताला जोरदार टक्कर देऊ इच्छित असेल. तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली होती, तर कसोटी मालिकेत  केला. दक्षिण आफ्रिकेचा संघ आणि मालिका वेळापत्रक खाली पाहा.

दक्षिण आफ्रिकी संघ: क्विंटन डी कॉक (कॅप्टन), टेंबा बावुमा, रस्सी वैन डेर ड्यूसेन, फाफ डु प्लेसिस, काइल वेरिन, हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, आदिले फेहलुकवायो, लुंगी एनगीडी, लुथो सिपमला, ब्युरन हेन्ड्रिक्स, एनरिच नॉर्टजे, जॉर्ज लिंडे, केशव महाराज.

आफ्रिकेचे भारत दौऱ्यावरील पूर्ण वेळापत्रक

12 मार्च, पहिली वनडे, धर्मशाळा

15 मार्च, दुसरी वनडे, लखनौ

18 मार्च, तिसरी वनडे, कोलकाता